Sunday 28 August 2022

कल्याण शहरात वाढले अवैध व्यवसाय, अवैध धंद्यांमुळे अनेक कुटुंब उध्वस्त ; पोलीस प्रशासनाने तातडीने घ्यावी दखल - महंत तपस्वी प प कर्मयोगी योगीदास पुरी महाराज_

कल्याण शहरात वाढले अवैध व्यवसाय, अवैध धंद्यांमुळे अनेक कुटुंब उध्वस्त ; पोलीस प्रशासनाने तातडीने घ्यावी दखल - महंत तपस्वी प प कर्मयोगी योगीदास पुरी महाराज_

"वैयक्तिक स्वार्थासाठी सरकारी यंत्रणेची डोळेझाक.... तरुण पिढी अडकत चालली अनैतिक धंद्याच्या जाळ्यात.... शासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्या भ्रष्टाचार मुळे देश पुन्हा जाईल गुलामगिरीत असेही म्हणाले मंहत"


कल्याण, प्रतिनिधी - गेल्या काही वर्षात कमी भांडवलात जास्त पैसा कमविणाच्या लालसेपोटी तरुणाई अवैध धंद्याकडे आकर्षित झाली आहे. त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे़. अशा धंद्याकडे तरूणांचा वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे. शहरातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे अनेक संसार, तरूण बरबाद होत आहेत. अशा अनैतिक व्यवसाय सर्व नियम धाब्यावर बसवून केले जातात ह्या कडे पोलिस जाणूनबुजून दुर्लक्ष करतात अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये केली जात आहे.

श्री धुनिवाले गजाजन महारास व्यसनमुक्ती बहुउद्देशी संस्थेचे संस्थापक महंत तपस्वी प. प. कर्मयोगी योगीदास पुरी महाराज यांनी कल्याण दौऱ्यावर असताना व्यक्त केले आहे.

मजूर, नोकरी, व्यवसाय करणारे तसेच लालसेपोटी उच्चशिक्षित तरूण, पुरूष, महिला बळी पडत आहेत. जास्त पैसे कमावण्याच्या नादात दारूविक्री, सट्टा पट्टी, जुगार, मटका अशा अवैध धंद्याकडे त्यांचा कल वळल्याचे दिसून येत आहे. छोट्या मोठ्या व्यवसायातून, नोकरीतून, जो पैसा कमविता येणार नाही तो पैसा अवैध धंद्यात सहज कमावता येतो असा त्यांचा समज आहे. त्यामुळे अधिक पैसा कमावण्याच्या लालसेनेच जिल्हाभर गावठी दारूचा व्यवसाय तर सट्टा पट्टी, जुगार हे उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. घरून मिळालेल्या पॉकेटमनी मध्ये संतुष्ट नसलेले तरुण, तर मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त अपेक्षा असलेला नोकरदार वर्ग याच्या आहारी गेला आहे. अत्यंत कमी पैशात जास्त पैसे मिळतात यामुळेच या सट्टा, मटका, जुगार, पत्त्यांचे क्लब यांच्या नादी लागून तरुण, संसारी व्यक्ती बरबाद होत आहेत. या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातुनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारी कडेही वळत आहे तर काही आत्महत्या करत आहेत. जागोजागी तरुण पिढी नशेच्या आहारी जातानाही दिसत आहे गोवा गुटका, विमान, चरस, गांजा, गावठी दारू, देशी दारू, एमडी डक्स अशा अनेक नशाला बळी पडतानाही तरुण पिढी ,विवाहित तरुण सामोरे जाताना दिसत आहे, अनेक जागी मेडिकल, पान टपरी येथेही नशेचा कारोबार केला जात आहे असे आमच्या निदर्शनास आले आहे सदर या सर्व लोकांचे हप्ते बांधलेले असल्यामुळे पोलीस प्रशासन व शासकीय विभाग यांच्यावर कारवाई करत नाही असेही सूत्रांचे आरोप आहेत. अवैध धंदेवाले फक्त काही महिन्याचा पॅकेज देतात म्हणून सरकारी यंत्रणा त्यावर दुर्लक्ष करणे हा मूर्खपणा ठरतो असेही महंत यांनी राग व्यक्त केला. स्वतःच्या स्वार्थापोटी शासकीय कर्मचारी, अधिकारी अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करून तरूण पिढीला बरबाद करत असेल तसेच लोकांचे संसार उद्ध्वस्त करेल तर या अधिकाऱ्यांमुळे देश गुलामगिरीत जाईल असेही महंत यांनी सांगितले.

या अवैध धंद्याच्या नादी लागुन कित्येक तरुण व नागरिक यांचे आपल्या कामधंद्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केली आहेत. तरीही या धंद्याच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. या व्यवसायाबद्दल आरडाओरड झाल्यास थातूरमातूर कारवाई केली जाते व काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालविण्यात येतात. त्यानंतर मात्र, परिस्थिती जैसे थे असते. संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात हे अवैध धंदे सुरू असून त्यामुळे आता स्वतः माननीय पोलिस आयुक्त यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील अशा धंद्याच्या आहारी गेलेल्या नागरिक व तरुणांकरिता मानसोपचार केंद्र व नशा मुक्त केंद्र उभारण्याची घोषणा श्री धुनिवाले गजाजन महारास व्यसनमुक्ती बहुउद्देशी संस्थेचे संस्थापक महंत तपस्वी प. प. कर्मयोगी योगीदास पुरी महाराज यांनी केली.

संपर्क - डॉ. आदर्श भालेराव ; +91 80707 05552

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...