Tuesday 30 August 2022

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात अडीच लाखावर चाकरमानी..!

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात अडीच लाखावर चाकरमानी..!


सिंधुदुर्ग, प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्षे गणेशोत्सव अत्यंत मर्यादीत स्वरुपात साजरा करण्यात आला. मात्र, यंदा गणेशोत्सवावरील निर्बंध हटवण्यात आल्याने गणेशभक्तांनी जल्लोष केला आहे.

कोकणात गणेशोत्सवाचा तुफान जल्लोष असतो. मुंबई-पुण्यातील अनेक कोकणी मंडळी गणेशोत्सवात आवर्जून गावी जातात. यंदा दोन वर्षांनी गणेशोत्सव साजरा होणार असल्याने रेल्वे गाड्या तुडुंब भरल्या तर आहेतच, शिवाय रस्ते मार्गावरून धावणाऱ्या गाड्याही फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे अगदी उद्यावर येऊन ठेपलेल्या बाप्पाच्या तयारीसाठी कोकणात वेग आला आहे.

गणेशोत्सवासाठी २७२ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. तर, नियमित ३२ गाड्या आहेत. एसटीच्या ३ हजार ५०० बसेस सोडण्यात आल्या असून १ हजार ९५१ गाड्यांना ग्रुप बुकिंग मिळाली असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

दरम्यान, सिंधुदुर्गात आतापर्यंत अडीच लाखावर चाकरमानी दाखल झाले आहेत. 

No comments:

Post a Comment

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !!

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !! मुंबई,  (शांताराम गुडेकर ) :         बूड़ोकन कराटे ...