Wednesday, 31 August 2022

व्याजाच्या नावाखाली पैशाची तिप्पट वसुली ! जातिवाचक उल्लेख करत वाद उकरून सावकाराची लोखंडी पाईपाने मारहाण !! "सावकार अटकेत"

व्याजाच्या नावाखाली पैशाची तिप्पट वसुली ! जातिवाचक उल्लेख करत वाद उकरून सावकाराची लोखंडी पाईपाने मारहाण !! "सावकार अटकेत"

पुणे, प्रतिनिधी : व्याजाच्या पैश्याच्या वसुलीसाठी जातिवाचक उल्लेख करत, पत्नीसंदर्भात अर्वाच्य उद्गार काढल्याने वादविवाद झाला. वादविवादात सावकाराने एकास लोखंडी पाईपाने मारहाण केल्याने एक जण जखमी झाला असून जातिवाचक शिवीगाळ व मारहाण प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्या सावकारास अटक करण्यात आली आहे.

तानाजी औदुंबर पाटील (रा. महतीनगर, इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. प्रताप तानाजी पलंगे (वय ४४ वर्षे, रा. कांबळेगल्ली, इंदापूर) यांनी त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. रविवारी (दि.२८) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास खडकपूरा भागात आरोपीच्या दुकानासमोर हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हा हिंदू खाटीक समाजाचा आहे. त्याचा शेळ्या मेंढ्या विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, १३ जाने २०२२ रोजी पत्नीची तब्येत अचानक खराब झाल्याने तिला बारामती येथील खाजगी हॉस्पीटल येथे उपचाराकरीता दाखल केले होते.

उपचारकामी १ लाख रुपये लागतील असे सांगितल्याने पैशाची अडचण आल्याने पलंगे यांनी खाजगी सावकार तानाजी औदुंबर पाटील याच्याकडून पत्नीच्या उपचारकामी १ लाख रुपये ५ टक्के व्याज दराने घेतले. यावेळी पाटील यांनी पलंगे यांच्याकडून युनियन बँकेचे इंदापूर शाखेचे तीन कोरे चेक सही करून घेतले.

त्यानंतर ७ मार्च २०२२ रोजी पलंगे हे खडकपूरा येथे पाटील यांच्या दुकानासमोर गेले, तेव्हा पाटील यांनी ५ टक्के दराने पैसे परवडत नाहीत २० टक्के दराने मी व्याज देणार नसेल तर माझे पैसे परत दे अशी मागणी केली. त्यावर पलंगे यांच्या म्हणण्यानुसार माझ्याकडे पैसे नसल्याने मी तयार झालो. त्याच वेळी मी त्यांना २५ हजार ५०० रूपये मुद्दल म्हणून दिले. मात्र त्यांनी ते व्याजातून जमा केले. त्यानंतर मी पाटील यांना वेळोवेळी पैसे देत गेलो.

२८ ऑगस्ट २०२२ रोजी आरोपी सावकार तानाजी पाटील यांनी प्रताप पलंगे यांना बोलावून घेतले. माझ्या व्याजाच्या पैश्याचे काय झाले अशी विचारणा करत फिर्यादीच्या दुचाकीची चावी घेतली. फिर्यादीने एक दोन दिवसात पैसे देतो असे सांगितल्यानंतर जातिवाचक उल्लेख करत फिर्यादीच्या पत्नीबद्दल अर्वाच्य उद्गार काढून, आरोपीने आपल्या दुकानातील लोखंडी पाईप फिर्यादीच्या डोक्यात मारला अशा आशयाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोक्यात पाईप लागल्याने जखमी झालेले प्रताप पलंगे हे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. सावकार तानाजी पाटील या आरोपीला अटक करण्यात आली आहे. बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ! घाटकोपर, (केतन भोज...