प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा तालुकाध्यक्ष पदाबाबत इंजि.चेतनसिंह पवार यांच्या नावाला हिरवा कंदील !
**प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा इंजि.चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास कायम** !
मुरबाड /श्री.मंगल डोंगरे : मंगळवार, दि.२२ जुलै २०२५ रोजी मुरबाड तालुका ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी इंजि. चेतनसिंह पवार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेनुसार प्रदेश उपाध्यक्ष अँड.गणेश पाटील यांनी पुनर्नियुक्ती केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षाच्या पुनर्बांधणी कार्यक्रमांतर्गत मुरबाड तालुका ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पदाबाबत मुंबई येथील प्रदेश कार्यालयात विविध इच्छुकांच्या मुलाखती झाल्या होत्या परंतु प्रदेशाध्यक्ष व मुलाखत कमिटीने इंजि.चेतनसिंह पवार यांनाच तालुकाध्यक्षपदी कायम केल्याबाबतचे पत्र ई-मेल द्वारे पाठवले.
सदरील नियुक्त बद्दल प्रदेशाध्यक्ष श्री.हर्षवर्धन सकपाळ, राष्ट्रीय सचिव यू बी व्यंकटेश, प्रदेश कार्याध्यक्ष खा.चंद्रकांत हंडोरे ह्या नेतृत्वाचे व विशेष करून प्रदेश उपाध्यक्ष अँड.गणेश पाटील, प्रदेश सचिव-निरीक्षक गुरुविंदरसिंग बच्चर तसेच जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांचे आभार चेतनसिंह पवार व्यक्त केले तर मुरबाड तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते आणि सहकारी पदाधिकारी यांच्या मेहनती मुळेच पुनर्नियुक्ती झाल्याचे प्रतिपादन यांनी केले. मुरबाड तालुक्यातील उच्चशिक्षित, सर्वसमावेशक, उत्तम संघटक व सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये तसेच तालुक्यातील प्रशासकीय प्रश्न सोडवण्यामध्ये हातखंडा असलेले नेतृत्व म्हणून चेतनसिंह पवार यांचा परिचय तालुक्यात आहे त्यामुळे तालुक्यातील विविध भागातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment