वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी स्थानिक वास्तव्य प्रमाणपत्राऐवजी वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक !!
परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी १७ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार सार्वजनिक सेवा वाहनांच्या वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी यापुढे एस.ई.सी. नमुन्यातील स्थानिक वास्तव्य प्रमाणपत्राऐवजी राज्यशासनाकडून निर्गमित वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
त्यामुळे सर्व वाहनचालक, वाहनमालक, वाहनचालक प्रशिक्षण संस्था तसेच संबंधित नागरिकांनी सार्वजनिक सेवा वाहनांच्या अनुषंगाने अर्ज करताना आवश्यक त्या कागदपत्रांसोबत वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र जोडूनच अर्ज सादर करावा. आवश्यक प्रमाणपत्र सादर न केल्यास अर्ज प्रलंबित राहू शकतो किंवा नामंजूर होण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी या सुधारित सूचनांची नोंद घेऊन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment