कागदावरच कारवाई; रस्त्यावर फेरीवाल्यांची दादागिरी व प्रभागात ठिकठिकाणी अनअधिकृत बांधकाम !!
*कल्याण, प्रतिनिधी*
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग 10-ई मधील अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई व प्रभागामध्ये भूमाफियावर केवळ कागदोपत्री असल्याचा आरोप समाजसेवक मनोज गिरी यांनी केला आहे.
*रस्त्यावरील अतिक्रमण मुळे वाहतूक कोंडी आणि रुग्णवाहिकांना अडथळा* *प्रभागात ठिकठिकाणी अनअधिकृत बांधकामा मुळे जुन्या रहिवाशांना पाणी आरोग्य रस्ते अशा सुविधांचा तुटवडा*
गर्दीच्या ठिकाणी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. हॉस्पिटलसमोरील रस्तेही अडवल्याने रुग्णवाहिकांना मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे गिरी यांनी सांगितले.
*वारंवार तक्रारी, मात्र कारवाई नाही*
या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही प्रभावी कारवाई न झाल्याने मी प्रशासनाला दोन वेळा आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळी कारवाईचे आश्वासन फेरीवाले व अनाधिकृत बांधकामावर कारवाईचे खोटे आश्वासन मिळाले, पण प्रत्यक्षात कारवाई झालेली नाही, असेही त्यांनी म्हटले.
*चित्रीकरणादरम्यान धमकीचा आरोप*
पेंढारकर कॉलेज परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांचे चित्रीकरण करत असताना मला त्यांच्याकडून धमकावण्यात आले. याबतची तक्रार मी मानपाडा पोलीस ठाणे, सहाय्यक आयुक्त डोंबिवली आणि उपायुक्त परिमंडळ 3 यांच्याकडे केली आहे, असे गिरी यांनी स्पष्ट केले.
*कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी*
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने अनधिकृत फेरीवाल्यांवर व अनाधिकृत बांधकामावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समाजसेवक मनोज गिरी यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment