Friday, 11 September 2026

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

*चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :*

"दिसता चट्टा, डॉक्टरांना भेटा..! येता कण-कण तापाची, करा तपासणी रक्ताची..! सावध राहा, सुरक्षित राहा, एड्सपासून दूर राहा. टीबीला हरवायचे आहे, देश स्वस्थ करायचा आहे."

अशा विविध आरोग्य संदेशांचा संदर्भ घेत चाळीसगाव शहरात डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप इत्यादी कीटकजन्य आजार तसेच इतर साथीच्या आजारांच्या प्रतिबंधासाठी आणि कुष्ठरोग, क्षयरोग, एचआयव्ही-एड्स जनजागृतीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दिनांक ११/०९/२०२६, वार शुक्रवार रोजी नालंदा माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव येथे डेंग्यू व इतर कीटकजन्य, जलजन्य आजार, साथीचे आजार, एचआयव्ही/एड्स आणि कुष्ठरोग, क्षयरोग या विषयावर जनजागृतीपर आरोग्य शिबीर उत्साहात पार पडले.

सहायक संचालक (हिवताप) नाशिक आदरणीय डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक वर्ग-१ डॉ. राजेंद्र चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी श्रेणी-१ डॉ. वैदेही पंडित, डॉ. मंथन, डॉ. बागडे, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. खैरनार, चाळीसगाव नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. बांगर, आरोग्य विस्तार अधिकारी श्री. सोनवणे, हिवताप पर्यवेक्षक श्री. किरण बेलदार, श्री. ममराज राठोड, श्री. रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव येथील कुष्ठरोग अवैद्यकीय सहायक महेश सूर्यवंशी, समुपदेशक नामदेव अहिरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सचिन महाले, आरोग्य सेवक दीपक ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिबिरात डेंग्यू, चिकनगुनिया, हत्तीरोग, हिवताप यांसारख्या कीटकजन्य आजारांची लक्षणे व उपाय, जलजन्य व साथीच्या आजारांपासून घ्यावयाची काळजी, तसेच एचआयव्ही-एड्स आणि कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज दूर करून सविस्तर आरोग्य शिक्षण देण्यात आले. सर्व आजारांविषयी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारीवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा; २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश !!

उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा; २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश !! *४० वर्षांच्या संघर्षाला न्यायालयीन लढ...