कल्याणमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च; ५२ हजारहून अधिक गणेश मूर्तींसाठी कडेकोट बंदोबस्त !!
*कल्याण, दि. १२ सप्टेंबर २०२६ :*
कल्याण उपायुक्त परिमंडळ - ३ च्या अंतर्गत एकूण ५२,५४४ खाजगी, ७,२२० गौरी आणि ३०२ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. या निमित्ताने परिमंडळ येथील बंदोबस्तासाठी उपायुक्त (२), सहायक आयुक्त (४), पोलीस निरीक्षक (२५), सहायक पोलीस निरीक्षक/फौजदार (८०), पोलीस अंमलदार (७९५), होमगार्ड (१६०) व दोन स्ट्रायकिंग प्लाटून तैनात करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आज दिनांक १२/०९/२०२६ रोजी मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (कल्याण विभाग) श्री. अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
रूट मार्च सायंकाळी १८:०० वा. महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून सुरू होऊन पुढे मोहम्मद अली चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश करून शंकरराव चौक - घेलादेवजी चौक - गांधी चौक - जुने बाजारपेठ पोलीस स्टेशन - दूधनाका - पारनाका - लाल चौकी या ठिकाणी सायंकाळी १८:४० वा. समाप्त करण्यात आला.
या रूट मार्चमध्ये मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. अशोक होनमाने स्वतः, वपोनि महात्मा फुले पोलीस स्टेशन, १३ पोलीस अधिकारी, ७२ पोलीस अंमलदार, ३२ नवप्रविष्ट पोलीस अंमलदार, ४२ SRPF अंमलदार, २० होमगार्ड, ०२ CRM मोबाईल, ०२ पीटर मोबाईल, ०२ बीट मार्शल सहभागी होते.
No comments:
Post a Comment