मनसे उपविभाग अध्यक्ष पदी संदेश मोरे यांची निवड !
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगर पालिकेची पूर्व तयारी सुरू केली असून अनेक प्रभागात सक्रिय कार्यकर्त्यांना पदावर बढती देऊन पक्ष बळकट करण्याची संधी दिली आहे. घाटकोपर विधानसभा क्षेत्रात ही नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असून विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष संदेश पांडुरंग मोरे यांची प्रभाग क्रमांक १२६ आणि १२७ या प्रभागाकरिता उपविभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक १२६ व १२७ च्या उपविभाग अध्यक्ष पदी संदेश पांडुरंग मोरे यांची नियुक्ती करून राज ठाकरे यांनी नुकतेच कृष्णकुंज येथे संदेश मोरे यांना नियुक्ती पत्र देऊन मिळालेल्या संधीचे सोने करून पक्ष वाढवाल अशी आशा व्यक्त केली. निष्ठावंत कार्यकर्त्याची उपविभाग अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संदेश पांडुरंग मोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.
No comments:
Post a Comment