Wednesday, 30 June 2021

राज्यातील सहाय्यक शिक्षक, शिक्षणसेवक यांचा परिविक्षाधीन कालावधी रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करण्याबाबतची याचिका दाखल करणार : प्रोटॉन !

राज्यातील सहाय्यक शिक्षक, शिक्षणसेवक यांचा परिविक्षाधीन कालावधी रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करण्याबाबतची याचिका दाखल करणार : प्रोटॉन ! 
    

        बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेचे श्री. एन. बी.कुरणे सर राष्ट्रीय महासचिव, श्री. संतोष घरत सर राज्य उपाध्यक्ष, श्री. गणेश पाटील सर जिल्हा अध्यक्ष, श्री. दिपक मोरे जिल्हा प्रभारी, प्रोटॉन संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष श्री. धनंजय पवार सर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. सुर्यकांत कासे सर, भारत मुक्ती मोर्चा, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष श्री. महेश जाधव सर तसेच विजय जाधव, संदीप गायकवाड, अनिल मोरे, विजय मोरे, संतोष पोटले, तैमूर गोविलकर, सलीम उके, मिथुन चांदोरकर, मोहन जाधव, रोहन तांबे. रफीक कार्डेकर, शकील वस्ता यांना  सहाय्यक शिक्षक ( परिविक्षाधीन ) शिक्षणसेवक यांचा परिविक्षाधीन कालावधी रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करण्याबाबतची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्याबाबत रायगड जिल्ह्यातील शिक्षणसेवकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. 
      याप्रसंगी स्टार ढाबा, म्हसळा येथे राज्यातील शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत मान्यवरांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राष्ट्रिय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेने बामसेफच्या वकील लॉबीशी कायदेशिर चर्चा करून शिक्षणसेवकांच्या समस्या लक्षात घेऊन शिक्षणसेवक यांना सहकार्य करण्याची पूर्णपणे तयारी दर्शविलेली आहे. आजवर राज्यातील प्रस्थापित सर्व शिक्षक संघटनांनी शिक्षणसेवक यांचा फक्त शिक्षक पतपेढी निवडणुका आणि आपल्या संघटनेच्या राजकारणा पुरता वापर केलेला आहे. 
       मात्र शिक्षणसेवक यांच्या मूळ समस्या सोडविण्यासाठी प्रस्थापित शिक्षक संघटना आणि संघटनेचे शिक्षक आमदार यांनी कधीही पुढाकार घेतला नाही. शिक्षणसेवकांच्या समस्येला प्रस्थापित शिक्षक संघटनांच्या निवेदनात दुय्यम स्थान देण्यात येत होते. तसेच सद्यस्थितीत शिक्षक संघटना स्वतः त्यांच्या मूळ समस्या सोडविण्यास असमर्थ असल्याने शिक्षणसेवक हे प्रस्थापित शिक्षक संघटनाकडून नाउमेद होते. 
        मात्र महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षणसेवकांचे शिक्षणसेवक रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत उच्च न्यायालयात याचिका टाकण्याची तयारी राष्ट्रिय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या ऑफशूट विंग प्रोटॉन (ऑल इंडिया प्रोफेसर, टीचर अँड नॉन टिचींग असोशिएशन) या संघटनेने दर्शविलेली आहे. तेव्हा महाराष्ट्रातील तमाम शिक्षणसेवक बांधवांना आग्रहाची नम्र विनंती आहे की, पहिल्यांदा स्वतःहून कोणीतरी आपल्या मूलभूत समस्येला निःशुल्क न्यायिक लढा देण्यासाठी तयारी दर्शविलेली आहे. 
      तेव्हा आपण आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन प्रोटॉन संघटनेच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे राहिलो पाहिजे. जेणेकरून संघटनेला आपला न्यायिक लढा लढण्यास मोलाची मदत होईल. तेव्हा राज्यांतील सर्व जिल्ह्यातील तमाम शिक्षणसेवक बांधवांना विनंती आहे कि, आपण जास्तीत जास्त संख्येने प्रोटॉन संघटनेचे सभासद व्हावे. सभासद होण्यासाठी संपर्क करा. आपल्या जिल्ह्यातील प्रोटॉन पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ! घाटकोपर, (केतन भोज...