Wednesday, 30 June 2021

गोव्यात पर्यटन खुलं, कोविड निगेटिव्ह रिपोर्टचीही गरज नाही, मात्र दोन्ही लशी घेणे बंधनकारक.!

गोव्यात पर्यटन खुलं, कोविड निगेटिव्ह रिपोर्टचीही गरज नाही, मात्र दोन्ही लशी घेणे बंधनकारक.! 
   
          
अरुण पाटील, भिवंडी :        
             गोवा (Goa) हे असं ठिकाण आहे जेथे केवळ देशातूनच नाही परदेशातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. गोव्यातील समुद्र, तेथील संस्कृती, मासे सर्वच अनोख असं आहे. मात्र गेल्या दीड वर्षांपासून लोकांना कोरोनामुळे घरात बसावं लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचं निमित्त साधून लोक घराबाहेर पडत होते. आता नव्या निर्बंधांमुळे नागरिकांना सायंकाळी 5 नंतर घरात राहणे अनिवार्य असेल.
               दरम्यान मूड फ्रेश करण्यासाठी गोवा हा पर्याय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे आता गोव्यात  जाण्यासाठी नागरिकांना कोविड निगेटिव्ह रिपोर्ट आणणं अनिवार्य नसेल. तर ज्या नागरिकांनी कोरोनाच्या दोन्ही लशी घेतल्या आहेत, ते गोव्यात पर्यटनासाठी येऊ शकतात.राज्य सचिवालयात पत्रकारांशी बातचीत करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत  (मुख्यमंत्री -गोवा, डॉ. प्रमोद सावंत )  यांनी सांगितलं की, गोव्यात संक्रमण दर 6 टक्के इतका आहे. तर रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लशींच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत, व त्यांच्याकडे याचं प्रमाणपत्र असेल तर त्यांना गोव्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल. ही अट पूर्ण केली असेल तर ते पर्यटनासाठी आलेले असो वा व्यवसायाच्यादृष्टीने, त्यांना अडविण्यात येणार नाही.
         पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यातील मोठ्या रेल्वे स्टेशनवर कोरोना टेस्टिंगची सुविधा वाढवण्यासाठी खासगी लॅबसोबत चर्चा सुरू आहे. शेजारील राज्यांमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिंएट समोर आल्यानंतर सीमा भागांवर अधिक कडक लक्ष दिलं जात आहे. गोव्यात अद्याप एकही डेल्टा प्लस व्हेरिंएटचा रुग्ण आढळला नाही.

No comments:

Post a Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती ! ** माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाखांचा ध...