Tuesday, 29 June 2021

नढई ग्रामस्थांच्या संघर्षाला अखेर यश ! तहसिलदारांच्या आदेशाने परंपरागत रस्ता होणार मोकळा !!

नढई ग्रामस्थांच्या संघर्षाला अखेर यश ! तहसिलदारांच्या आदेशाने परंपरागत रस्ता होणार  मोकळा !!


मुरबाड- ( मंगल डोंगरे ) : नढई ग्रामपंचायत हद्दीतील स्मशान भुमी व शेतकऱ्यांच्या शेतीवाडी कडे जाणाऱ्या परंपरागत वहिवाट असलेल्या रस्त्यावर सोसायटी आॕफ पिलार बाॕम्बे यांनी अतिक्रमण करुन संरक्षक भिंतीचे बांधकाम केले होते त्याविरोधात ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या, हरकती घेतल्या होत्या, परंतु सोसायटी आॕफ पिलार बाॕम्बे यांनी त्यांना न जुमानता सदर भिंतीचे बांधकाम सुरुच ठेवले होते. अखेर तहसिलदार मुरबाड यांना ग्रामस्थांनी विनंती करुन  लक्ष देण्याची  मागणी केली. 


ग्रामस्थांनी आपल्यावर होत असलेल्या अन्याय पुराव्यांसह सादर केला  तहसिलदार तथा दंडाधिकारी मुरबाड यांनी दि. २२/ ६ / २०२१ रोजी सोसायटीचे प्रतिनिधी, ग्रामस्थ , सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन काॕंग्रेसचे तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार, आर.पी.आय. (सेक्यूलरचे) ठाणे जिल्हा अध्यक्ष रविंन्द्र चंदने  यांना समवेत  घेऊन स्थळ पाहणी करुन  घेतली.


तसेच दि. २६ जून रोजी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करुन सोसायटी आॕफ पिलार बाॕम्बे ने केलेले संरक्षक भिंतीचे बांधकाम ७ दिवसांत पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सामनेवाला यांनी भिंतीचे बांधकाम न काढल्यास ग्रामसेवक यांनी ते निष्कासीत करावे व यापुढे भाविष्यात अडथळा निर्माण होईल असे बांधकाम करु नये. अशी ताकीद सामनेवाला यांना तहसिलदार तथा दंडाधिकारी यांनी दिली आहे. तहसिलदार यांनी दिलेल्या निर्णयामुळे गेले अनेक दिवस नढई ग्रामस्थ जो संघर्ष करत होते त्यांच्या लढ्याला अखेर यश आल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ! घाटकोपर, (केतन भोज...