कोसले येथील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !
टिटवाळा, उमेश जाधव -: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वाने प्रभावित होऊन तसेच पालकमंत्री एकनाथजी शिंदे आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख वसंतजी लोणे यांच्या नेतृत्वाखाली कोसले गावचे भाजपा कार्यकर्ते व पळसोली सेवा सोसायटीचे उपचेअरमन लक्ष्मण भोईर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे, भिवंडी तालुकाप्रमुख विश्वास थळे, ठाणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती कुंदन पाटील, भिवंडी पंचायत माजी उपसभापती प्रकाश भोईर, विष्णु चंदे, तालुका कार्यकारिणी सदस्य तुकाराम कडव, युवासेना जिल्हा सचिव अल्पेश भोईर, संपर्क प्रमुख कल्याण ग्रामीण रमेश बांगर, तालुका सहकार अध्यक्ष अनिल चौधरी, युवासेना समन्वयक संतोष सुरोशी, तालुका सचिव नामदेव बुटरे तसेच विभागातील शिवसैनिक व युवासेना पदाधिकारी युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे यांनी आपल्या मनोगतातून सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांनी एकमताने काम करावे, जर जुने शिवसैनिक काम करीत नसतील तर नव्या लोकांना काम करण्याची संधी दिली पाहिजे, इतरांपेशा आपलेच जास्त शत्रु आहेत. त्यामुळे संघटना वाढत नाही. यापुढे प्रत्येक शिवसैनिकांनी गावागावामध्ये शिवसेना शाखा वाढवून पक्ष वाढविण्यासाठी काम केले पाहिजे. इतर पक्षाचे कार्यकते शिवसेनेत प्रवेश करतात तेव्हा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, तसच ननी न कार्यकारणीबाबत परवानगी देण्यात यावी असेही सांगितले. जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांना सहकार्याच्या भावनेतून काम करावे असे सांगितले. यावेळी लताताई भोईर याची शिवसेनेच्या पळसोळी महीला उपविभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
No comments:
Post a Comment