नवमतदारांनी e-EPIC मतदार ओळखपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे रायगड जिल्हा प्रशासनाचे आवाहन !
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : भारत निवडणूक आयोगाने मतदारांना मतदान ओळखपत्र त्यांच्या मोबाइलवर डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे. मतदार पोर्टल किंवा मतदार हेल्पलाइन मोबाइल ॲप किंवा NVSP वरून नवीन मतदार हे e-EPIC डाउनलोड करू शकतात. संबंधित मतदारांनी ते डाऊनलोड करणे अपेक्षित आहे.
रायगड जिल्ह्यातील 12 हजार 832 नवीन मतदारांपैकी आतापर्यंत 4 हजार 366 मतदारांनी E-epic डाऊनलोड करून घेतले आहेत. उर्वरित 8 हजार 466 मतदारांनी e-EPIC डाऊनलोड करून घेण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
ही प्रक्रिया सहजपणे पूर्ण करता येते. शिवाय e-EPIC हे मतदारांना आपल्या मोबाईलमध्ये किंवा digi locker मध्येही ठेवता येते. ते गहाळ किंवा खराब होण्याचा प्रश्न उदभवत नाही. मतदारांना आपले e-EPIC मतदार पोर्टल:
http://voterportal.eci.gov.in/ किंवा एनव्हीएसपी: https://nvsp.in/ किंवा मतदार
हेल्पलाईन मोबाइल ॲप Android -https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen
iOS - https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004
याद्वारे डाऊनलोड करता येणार आहे.
या सुविधेत आपले e-EPIC मोबाईल / डेस्कटॉपवर डाउनलोड करण्यायोग्य असून डिजिटली मोबाईलवर संग्रहित करता येते. हे स्वतः मुद्रण (print) करण्यायोग्य आहे तसेच प्रतिमा आणि लोकसंख्याशास्त्रासह सुरक्षित QR कोड उपलब्ध आहे.
e-EPIC डाऊनलोड करण्याची प्रक्रिया Register Login on NVSP/ Voter Portal, EPIC क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक नमूद करणे, नोंदणीकृत मोबाईलवर पाठविलेला OTP तपासून घेणे, e-Epic डाउनलोड करणे अशा प्रकारे आहे.
या सुविधेची कार्यपद्धती एक व्यक्ती एक मोबाईल नंबर असलेले मतदार हे मतदार हेल्पलाईन App किंवा मतदार पोर्टलवर किंवा स्वतःच्या मोबाइल क्रमांकाने नोंदणी करून e-EPIC डाउनलोड करून घेऊ शकतात, अशी आहे.
माहे डिसेंबर 2020 व दि. 15 जानेवारी 2021 या कालावधीत नोंदणी केलेल्या नवमतदारांनी वर नमूद केलेल्या माध्यमांद्वारे e-Epic आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती वैशाली माने यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment