Tuesday 29 June 2021

शहापूर तालुक्यावर शोककळा " स्वराज्यरक्षक संभाजी " मधील खाशाबा हरपला, अवघ्या 29व्या वर्षी !

शहापूर तालुक्यावर शोककळा " स्वराज्यरक्षक संभाजी " मधील खाशाबा हरपला, अवघ्या 29व्या वर्षी !


अरुण पाटील, भिवंडी, दिं.29 :
           अभिनेता उज्ज्वल धनगर याचं वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. उज्ज्वलने "स्वराज्यरक्षक संभाजी" मालिकेतून अभिनयाची छाप सोडली होती. वयाच्या 29 व्या वर्षी त्याची प्राणज्योत मालवल्याने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर उज्ज्वलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी उपचारादरम्यान उज्ज्वल याचा मृत्यू झाला. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत उज्ज्वलने खाशाबा ही भूमिका साकारली होती. शिवाय त्याने ‘क्राईम पेट्रोल’, ‘लक्ष्य’ या मालिकांमध्ये देखील काम केलं होतं.  उज्ज्वल अनेक कार्यक्रमांमध्ये निवेदन देखील करायच्या. त्याच्या अकाली जाण्याने दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
             शहापूर तालुक्यातील सापगाव या लहानशा ठिकाणाहून आलेला उज्ज्वल अभिनय क्षेत्रात त्याची ओळख निर्माण करत होता.त्याच्या निधनाने शहापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. तो सध्या टिटवाळा या ठिकाणी राहत होता. त्याने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेसह ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतही खाशाबा साकारला होता. त्या मुळे खाशाबा ही त्याची ओळख बनली होती. सध्या तो क्राइम पेट्रोल या हिंदी मालिकेसाठी शूटिंग करत होता.
           मीडिया अहवालांनुसार, शनिवारी देखील त्याने क्राइम पेट्रोलचे शूटिंग संपवले आणि त्यानंतर रविवारी नगरसेवक संतोष तरे आणि समाजसेवक महेश ऐगडे यांच्याबरोबर जेवणंही केले होते.सोमवारी त्याच्या छाती आणि पोटात दूखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला डिस्चार्जही देण्यात आला, मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने पुन्हा एकदा भरती करावं लागलं होतं. यावेळी मात्र तो परतला नाही. उपचारादरम्यान उज्ज्वलने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या सह कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उज्ज्वलसाठी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...