मराठी कलावंत उज्वल धनगर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.."हरहुन्नरी कलाकार हरपला"..
टिटवाळा, उमेश जाधव -: मराठी रंगभूमीवर, चित्रपट सृष्टी तसेच टिव्ही वरील मराठी व हिंदी विविध मालिकांमध्ये काम केलेला कलावंत उज्वल धनगर यांचे सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन दुःखद निधन झाले आहे. मृत्यू समयी त्याचे वय २९ वर्षे होते. या घटनेने मांडा-टिटवाळा शहरासह लगातच्या परीसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुळचा शहापूर तालुक्यातील सापगाव येथील रहिवासी असलेला उज्वल धनगर हा गेली १५ वर्षांपासून टिटवाळा येथे रहातो. २००८ पासून फिल्मी दुनियेत पदार्पण करत अनेक मराठी चित्रपट, हिंदी-मराठी मालिका व नाटकांमध्ये आपल्या कलेचा ठसा उमटवला होता.
तसेच विविध सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात तो अतिशय उत्कृष्ट असे सुत्रसंचलन करत असे. नेहमी आपल्या अदाकारीने व सुत्रसंचलनाने लोकांना हसविण्याचे काम करत असे. स्वराज्य रक्षक संभाजी राजे या मालिकेतील त्याची खाशाबा ही व्यक्ती रेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. अशा प्रकारे अनेक मालिकांमध्ये त्याने अतिशय उत्कृष्ट भूमिका केलेल्या आहेत. नुकताच तो शनिवारी सोनी टिव्ही वरील क्राईम पेट्रोलींग या हिंदी मालिकेचे सुटींग संपून घरी आला होता. रवीवारी स्थानिक नगरसेवक संतोष तरे व समाजसेवक महेश ऐगडे यांच्या सोबत रात्री जेवण केले.
सोमवारी सकाळी सहा वाजता अचानक उज्वलला छातीत व पोटात दुखायला लागले म्हणून तो टिटवाळा येथील महागणपती रूग्णालयात गेला. डॉक्टरांशी बोलून ॲसिडिटी झाल्यासारखे वाटते म्हणून गोळी घेतली व फेरफटका मारून घरी आला. नंतर पुन्हा त्रास होऊ लागला म्हणून महागणपती रूग्णालयात आई-वडीलां सोबत गेला. डाॅक्टरांनी इसीजी लावली असता तो मृत झाला असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सर्वांना हसवणार उज्वल आज रडवून गेला. एक हरहुन्नरी कलावंत हरपला असल्याची खंत टिटवाळाकर व्यक्त करत आहेत. त्याच्या अंत्यविधीसाठी राजकीय, सामाजिक व सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment