Monday, 28 June 2021

दिलासादायक : आज सोमवारी राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत व मृत्यूंच्या संख्येत मोठी घट !

दिलासादायक : आज सोमवारी राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत व मृत्यूंच्या संख्येत मोठी घट !


मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारच्या तुलनेत सोमवारी मोठी घट झाल्याचे यला मिळाले. रविवारी ९ हजार ९७४ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. सोमवारी मात्र ६ हजार ७२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तसेच १० हजार ८१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ टक्के एवढे झाले आहे. 

आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६० लाख ४३ हजार ५४८ झाली व राज्यात आजपर्यंत एकूण ५८,००,९२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ टक्के एवढे झाले असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ८७४ इतकी झाली आहे. 
तर रविवारी १४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता, तर सोमवारी १०१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. 


No comments:

Post a Comment

शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्या संस्थेतर्फे प्रति पंढरपूर वडाळा येथे दिंडी सोहळा संपन्न !!

शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्या संस्थेतर्फे प्रति पंढरपूर वडाळा येथे दिंडी सोहळा संपन्न !! *** श्री.संजय दत्तात्रय भालेर...