राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार ! रिकव्हरी रेट ९५.९१ तर मृत्यूदर २ टक्के !
मुंबई : राज्यात आज कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाली असून मृत्यूंच्या संख्येत मात्र घट झाली आहे. याशिवाय, राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५ टक्क्यांच्यावर आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ९ हजार ९७४ नवे कोरोनाबाधित आढळले असून १४३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.० टक्के एवढा आहे. त्यामुळे राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ३६ हजार ८२१ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २१ हजार २८६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख २२ हजार २५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात आज ८ हजार ५६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत ५७ लाख ९० हजार ११३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.९१ टक्के एवढं झालं आहे.
No comments:
Post a Comment