चोपडा येथे "रोटरी भवन" चे भूमिपूजन संपन्न
"चोपडा रोटरीचे पन्नास वर्षापूर्वीचे स्वप्न साकार होणार" : मा.अरुणभाई गुजराथी
चोपडा वार्ताहर : रोटरी क्लब चोपडा हे आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. चोपडा रोटरी क्लब गेल्या पन्नास वर्षापासून अविरत निस्वार्थ सेवा करीत आली आहे. दिनांक २४ जून २०२१ रोजी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०चे प्रांतपाल मा. शब्बीर शाकीर यांनी रोटरी क्लब चोपडा ला सदिच्छा भेट दिली असता त्याचे औचित्य साधून त्यांच्या शुभहस्ते रोटरी क्लब चोपडा व चोपडा रोटरी सेवा संस्था यांच्या रोटरी भवन चे भूमिपूजन करण्यात आले. रोटरी भवनासाठी चोपडा नगरपरिषदेने जवळपास दहा हजार स्क्वेअर फुट एवढी जागा शिरपूर रोड वरील हरेश्वर कॉलनी येथे उपलब्ध करून दिली आहे. त्याचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी कळविले आहे .
आदरणीय शब्बीर शाकीर यांनी सपत्नीक भूमिपूजन करून कोनशिलेचे अनावरण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अरुणभाई गुजराथी, माजी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या भाषणामध्ये रोटरी क्लब चोपडा चे पन्नास वर्षापूर्वी चे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे सांगितले. तर प्रांतपाल शब्बीर शाकीर यांनी चोपड्याला गौरवशाली अशी परंपरा असल्याचे सांगितले तसेच रोटरी क्लब चोपडा ने केलेल्या कार्याचे कौतुकही केले.
मा. शब्बीर शाकीर यांचा सत्कार चोपडा रोटरी सेवा संस्थेचे अध्यक्ष अशिषभाई गुजराथी यांनी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अरुणभाई गुजराथी यांचा सत्कार रोटरी क्लब चोपडा चे अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी केला.
मा. सौ मनीषाताई चौधरी- नगराध्यक्ष, चोपडा नगरपरिषद चोपडा, मा. टॉबी भगवागर- डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी, कॉन्फरन्स चेअर मा. अतुल शाह, गटनेते मा. जीवनभाऊ चौधरी, सह प्रांतपाल मा. योगेश भोळे, सुवर्ण महोत्सवी वर्षाचे रोटरी क्लब चोपडा चे प्रेसिडेंट नितीन अहिरराव, चोपडा रोटरी सेवा संस्था चे अध्यक्ष अशिष गुजराथी, रोटरी क्लब चोपडा सेक्रेटरी ॲड. रुपेश पाटील, चोपडा रोटरी सेवा संस्था उपाध्यक्ष एम डब्ल्यू पाटील, सेक्रेटरी ॲड. अशोक जैन, सौ पुनम गुजराती, प्रफुल्ल गुजराथी, पंकज बोरोले, रमेश वाघजाळे, व्ही एस पाटील, डॉक्टर शेखर वारके, धीरेंद्र जैन, चंद्रशेखर साखरे, विलास कोष्टी, प्रदीप पाटील, अनिल अग्रवाल, ॲड. अशोक जैन, प्रसन्ना गुजराथी, दीपक लोहाणा व इतर सर्व रोटरी सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment