Wednesday 30 September 2020

मुरबाड तालुक्यात चालका अभावी सहा आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका बंद "तातडीच्या उपचारासाठी रुग्णांची भटकंती"

मुरबाड तालुक्यात चालका अभावी सहा आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका बंद "तातडीच्या उपचारासाठी रुग्णांची भटकंती"


मुरबाड (मंगल डोंगरे) - कोरोना कोविड 19 या महामारीने संपुर्ण जगभरात भितीचे वातावरण असल्याने त्या महामारीला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असताना मुरबाड तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी सहा आरोग्य केंद्रात वाहन चालक नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदार कारभारा बाबत सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

             ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीची आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी. तसेच गर्भवती महिला, सर्पदंश, विंचु दंश, विषबाधा, किंवा छोटेमोठे अपघात यासाठी लागणाऱ्या उपचारासाठी बाधित रुग्णांना पायपीट होऊ नये किंवा त्यांना मोफत प्रवासाचे साधन उपलब्ध व्हावे म्हणुन राज्याचे आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राना 102 हि रुग्ण वाहिका दिलेली असताना त्या गाडीवर लागणारा ड्रायव्हर तसेच इंधन खर्चाची देखील तरतुद केलेली असते. हि वाहने देखील शासनाचे आदेशानुसार रुग्णांना तातडीची सेवा देतात. तसेच फावल्या वेळी आरोग्य केंद्रासाठी लागणारा औषध साठा हा जिल्ह्यावरुन पुरवठा होत असल्याने हि वाहने पंधरा दिवसातुन एकदा जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे जात असतात .परंतु मुरबाड तालुक्यातील 9 पैकी  म्हसा,नारिवली, तुळई, धसई, सरळगाव, शिरोशी या 6 आरोग्य केंद्रात असणाऱ्या रुग्ण वाहिकांना गेल्या दोन वर्षापासून चालक नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना तातडीचे उपचारासाठी खाजगी वाहनाचा शोध घ्यावा लागतो.मात्र सध्या कोरोना कोविड 19 या जीवघेण्या आजारामुळे प्रत्येकाचे मनात भिती निर्माण झाली असल्याने खाजगी वाहन चालक या रुग्णांची वाहतुक करण्यासाठी प्रथम नकार देतात .व नंतर अव्वाच्या सव्वा भाडे आकारुन रुग्णांचे नातेवाईकांची लुबाडणुक करतात. दरम्यान आरोग्य केंद्राची रुग्ण वाहिका हि काही वेळा मालवाहतुक करत असल्याने तीचा वापर वैद्यकीय अधिकारी हे जिल्ह्यावरुन औषध वाहतुकीसाठी करत असल्याचे हा औषध साठा आणण्यासाठी देखील त्यांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. व त्याचे मर्जी प्रमाणे भाडे द्यावे लागते.

           .** सदरच्या आरोग्य केंद्रात असणाऱ्या वाहनावर चालक हे इतरत्र बदली केले आहेत. तर काही ठिकाणी सेवानिवृत्त झाले असल्याने रिक्त पदे भरण्याची जबाबदारी हि गटविकास अधिकारी यांची आहे.-- श्रीधर बनसोडे.तालुका आरोग्य अधिकारी.

       ***सदरची रिक्त पदे भरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडुन मार्गदर्शन मागविण्यात येत आहे. ते प्राप्त होताच भरती प्रक्रिया केली जाईल-- रमेश अवचार. गटविकास अधिकारी. पंचायत समिती मुरबाड.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...