Wednesday, 30 September 2020

करोना नियंत्रणासाठी व्यापारी उद्योजकांचा सहभाग महत्त्वपूर्ण - राज्यमंत्री कु.आदिती तटकरे

करोना नियंत्रणासाठी व्यापारी उद्योजकांचा सहभाग महत्त्वपूर्ण - राज्यमंत्री कु.आदिती तटकरे


महाराष्ट्र चेंबर व राजारामपुरी असोसिएशन तर्फे जनजागरण अभियानाचा शुभारंभ !

       बोरघर / माणगांव (विश्वास  गायकवाड) : करोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जनजागरण आवश्यक असून त्यासाठी व्यापारी उद्योजकांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे  प्रतिपादन राज्याच्या पर्यटन, पर्यावरण, माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार, विधी व न्याय, उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.   
         महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या राज्यव्यापी जनजागरण अभियानाचा शुभारंभ, माहितीपत्रकाचे प्रकाशन व मास्कचे अनावरण कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. 
      यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, वेदांत पाटील, सागर नागरे आदी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्याचा वृत्त्तांत विषद केला.       
         राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी असोसिएशनच्या रौप्य  महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवीत असल्याचे यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...