Thursday, 1 October 2020

स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर संपन्न !!

स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर संपन्न !!


      बोरघर / माणगांव रायगड (विश्वास गायकवाड) -दिनांक  ०१ ऑक्टोबर “राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान” दिनानिमित्त सी.आय. एस.एफ.थळ, पोलीस पाटील संघटना आणि जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
       राष्ट्रीय स्वैच्छिक दिनानिमित्ताने रक्तदात्यांमध्ये रक्तदानाविषयी जागृती व्हावी, तसेच रुग्णालयात तातडीच्या शस्रक्रिया, प्रसूती, थँलेसिमिया, हिमोफिलिया, अपघात अशा रुग्णांना नेहमी रक्ताची गरज भासते.यासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करुन गरजू रुग्णांना तातडीच्या वेळेस रक्ताची कमतरता भासू नये यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, डॉ.दिपक गोसावी यांच्या पुढाकाराने “स्वेच्छेने रक्तदान करु या आणि कोरोना लढ्यात सहभागी होऊ या!” याउद्देशाने स्वैच्छिक रक्तदान शिबीर रक्तपेढीत आयोजित करण्यात आले होते .
     या शिबिरात सीआयएसएफ,थळ, रक्तपेढी प्रमुख डॉ. दिपक गोसावी, डॉ. अमोल भुसारे, डॉ पोटे, रक्तपेढी तंत्रज्ञ सुनील बंदिछोडे आदी सर्वांनी मिळून एकूण 33 जणांनी स्वैच्छिक रक्तदान केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्कचा वापर करण्यात आला होता.
    हे रक्तदान यशस्वी करण्यासाठी डॉ.दिपक गोसावी, हेमकांत सोनार, सुनील बंदिछोडे, पुनम पाटील, चेतना वर्तक,मनिषा नवाळे, प्रज्ञा पवार, उमेश पाटील, संकेत घरत आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने झालेल्या भांडणात वडिलांना वाचविताना मुलीचा मृत्यू‌ !!

दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने झालेल्या भांडणात वडिलांना वाचविताना मुलीचा मृत्यू‌ !! कल्याण, प्रतिनिधी : कल्याण, इंदिरानगर ...