स्वच्छता मोहिमेत मुरबाड नगर पंचायत पुन्हा एकदा ठरली अव्वल !!
शहरात **मि पण स्वच्छताग्रही मोहिमेचा शुभारंभ **
मुरबाड (मंगल डोंगरे) : मा.पंतप्रधान यांनी देशाच्या नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत भागीदारी वाढवण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात केली आहे. नुकताच स्वच्छ सर्वेक्षण 2020 चा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2020 स्पर्धेत मुरबाड नगरपंचायतीने *देशात पश्चिम विभागात 54 वा व राज्यात 37 वा* क्रमांक पटकाविला आहे. 2 ऑक्टोबर 2020 हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची 151 वी जयंती साजरी होत असतानाच त्या सोबतच स्वच्छ भारत मिशनचा ६ वा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जात आहे . त्या अनुषंगाने नागरी घनकचरा व्यवस्थापनाच्या अंतर्गत *कचर्याचे वर्गीकरणाबाबत जनजागृती उपक्रम* मुरबाड नगरपंचायत मार्फत हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत मुरबाड नगरपंचायत कार्यक्षेत्रात घरोघरी भेट देऊन ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करणे व स्वच्छतादूत/ स्वच्छताग्रही यांनी प्रभागनिहाय स्थानिक नगरसेवकांच्या सहभागाने घरोघरी भेटी देऊन स्वच्छता विषयक मार्गदर्शनपर माहितीपत्रकाचे वाटप करणे योजिले आहे.त्यात *‘मी पण स्वच्छताग्रही’* या मोहिमेचा शुभारंभ मा.आमदार किसन कथोरे साहेब,नगराध्यक्षा सौ. छाया चौधरी, मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ, उपनगराध्यक्ष सौ. अर्चना विशे, आरोग्य सभापती श्री.नारायण गोंधळी व सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या उपस्थितीत पार पडला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सदर स्वच्छता मोहिमेस सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.
No comments:
Post a Comment