Saturday 26 September 2020

वरप येथील कोरोना कोव्हीड सेंटर आता कर्मचार्‍यांच्या व्हेंटिलेटर वर ! प्रश्न इथले संपत नाही?

वरप येथील कोरोना कोव्हीड सेंटर आता कर्मचार्‍यांच्या व्हेंटिलेटर वर ! प्रश्न इथले संपत नाही?


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप कांबा या गावासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आधार ठरणारे वरप येथील कोरोना कोव्हीड सेंटर सुरू होण्याची चिन्हे काय दिसत नाहीत. आता या हाॅस्पिटल ला" स्टाप" मिळत नसल्याचे कारण पुढे केले जात असून लवकरच तोही प्रश्न सुटेल अशी अपेक्षा व्यक्त करुया.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात झपाटय़ाने कोरोना पाॅझिटिव रुण्गांची संख्या वाढत आहे. लाॅकडाऊण शिथिल झाल्याने नागरिकांची वर्दळ वाढली आहे. गर्दी होत आहे. दुकानदार व ग्राहक कोरोना चे कोणते ही नियम पाळत नाहीत बिर्लागेट येथे हे चित्र सर्वत्र पहायला मिळते आहे. म्हारळ वरप कांबा येथे अनेकांचा कोरोना ने बळी घेतला आहे. हे चित्र इतर गावामध्ये सुध्दा आहे. प्रत्येक गावांच्या चौकात श्रद्धांजली चे बॅनर ची संख्या वाढत आहे. सध्याच्या काळात कल्याण ग्रामीण भागात कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे प्रमाण शंभरीकडे जात आहे तर अॅक्टिव रुग्णाची संख्या १५४६ वर पोहोचली आहे कंन्टेनमेंट झोन ७२ झाली आहे. गावा गावात रुग्ण आढळून येत आहेत. माझे कुंटूब माझी जबाबदारी यातूनही पेंशंट वाढत आहेत. या सर्वांचा विचार करून वरप येथे कोरोना कोव्हीड सेंटर उभारण्याचा निर्णय झाला. महसूल विभाग व कल्याण पंचायत समितीच्या माध्यमातून हे काम सुरू ही झाले. लोकप्रतिनिधी व पत्रकारांनी केलेला पाठपुराव्यामुळे वरप कोरोना कोव्हीड सेंटर सुरू व्हायच्या अगदी जवळ आले असताना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी २०० च्या जागी ५०० बेड ची कल्पना मांडली. आणि होते ते पण लांबणीवर पडले. यातूनही मार्ग काढत रस्ता, शौचालय, ताडपत्री, पाणी हे प्रश्न कसेबसे सोडवून हे सुरु होणार असे दिसत असतानाच जनरेटर चा मुद्दा पुढे आला. मात्र कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी स्वत खर्च करून तीही अडचण दूर केली. अद्यापही हे रुग्णालय सुरू होत नसल्याने कालच माझे कुंटूब माझी जबाबदारी या कार्यक्रमाचे निमित्ताने गोवेली येथे आलेल्या झेडपीच्या अध्यक्षा सुषमा लोणे आणि नुकताच ठाणे जिल्हा परिषदेचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यानंतर कल्याण तालुक्यात आलेल्या श्रीमती रुपाली सातपुते यांना पत्रकार संजय कांबळे यांनी वरप कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्या बाबत प्रश्न विचारले असता मी ताबडतोब जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना विचारते तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रींकात शिंदे यांना पत्र दिल्याचे सांगितले. तर अतिरिक्त सीईओ रुपाली सातपुते यांनी ही यामध्ये लक्ष घालतो असे सांगितले पण आज माहिती घेतली असता असे कळले की आता या कोव्हीड केअर सेंटर साठी स्टाप उपलब्ध होत नाही.त्यामुळे आता पुढे काय होणार असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. तर आपण ऐवढा प्रयत्न केला हाही प्रश्न सुटेल असा विश्वास अध्यक्षा सुषमा लोणे यांनी व्यक्त केला आहे. परंतु ग्रामीण भागातील वाढणारे पेंशंट विचारात घेता हे कोव्हीड केअर सेंटर किमान पुढील महिन्यात तरी सर्व सोईसुविधा युक्त सुरू व्हावे हिच ग्रामस्थांची माफक अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...