Saturday 26 September 2020

मांजर्ली गावातील शेतकऱ्यांचे कापणीस आलेले भातपिक पाण्यात, शेतात पाणी, डोळ्यांत पाणी शेतकऱ्यांची अशी 'जिंदगानी'?

मांजर्ली गावातील शेतकऱ्यांचे कापणीस आलेले भातपिक पाण्यात, शेतात पाणी, डोळ्यांत पाणी शेतकऱ्यांची अशी 'जिंदगानी'?



कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यात झालेल्या मुसळधार वादळी पाऊसाने मांजर्ली गावातील शेतकऱ्यांचे कापणीस आलेले अख्खे भातपिक पाण्यात पडले असून याकडे पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाण्याने भरून आले होते यावेळी कोरोना मुळे शेतकऱ्यांची अवस्था 'आई जेवू घालेना आणि बाप भिक मागू देईना' अशी झाली आहे.


कल्याण तालुक्यात सुमारे ६हजार हैक्टर क्षेत्रात भातपीक आणि १५० ते ३५० हैक्टर क्षेत्रात भाजीपाला लागवड केली जाते. परंतु या वर्षी कोरानामुळे होत्याचे नव्हते झाले. या बिमारीमुळे ऐन भात लावणीच्या वेळी मजूर मिळेना. शेतकऱ्यांनी कसेतरी घरच्या च्या मदतीने भात लावणी उरकून घेतली. तर ज्या शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली होती. तो तर कवडीमोल दराने विकावा लागला किंवा सडून कुजून गेला. कसेतरी करून भाजीपाला शेतातून बांधावर आणला तर वाहन मिळेना, वाहन मिळालेच तर मार्केट बंद, यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न हे खर्चापेक्षा कैक पटीने कमी मिळू लागले होते. त्यामुळे तो चिंताग्रस्त झाला होता. भातपिक हा एकच मोठा आधार होता. कारण वर्षभराचा प्रश्न निकालात निघणार होता.पीक ही चांगले आले होते. कल्याण सह मुरबाड तालुक्यात १०/१२ दिवसात भात कापणी ला सुरुवात केली जाणार होती पण गेल्या चार ते पाच दिवसात पडलेल्या मुसळधार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळेगाव, मढ शेरे, उशीद वाशिंद, शिरगाव आपटी, मांजर्ली येथे उभे भात आडवे झाले आहे. मांजर्ली गावातील नघलू घारे या शेतकऱ्यांचे कापणीस आलेले भातपिक पाण्यात भिजवून गेले आहे. अशीच परिस्थिती इतर गावातील शेतकऱ्यांची झाली आहे. कोरोनोच्या संकटातून वाचलेल्या शेतकऱ्यांवर निसर्गाने आसूड ओढले आहेत. त्यामुळे आता मायबाप सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन आधार द्यावा अशी मागणी केली जात आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...