Tuesday 29 September 2020

मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेश द्वारावरच मुंडण आणि तेराव्याचा विधी करत श्रमजिवी संघटनेने केला आदिवासी विभागाचा निषेध !!

मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेश द्वारावरच मुंडण आणि तेराव्याचा विधी करत श्रमजिवी संघटनेने केला आदिवासी विभागाचा निषेध !!
 
       
मुरबाड {मंगल डोंगरे} : गेल्या मार्च- एप्रिल महिन्यांपासून शासनाने कोरोना संकटामुळे लाॕकडाऊन घोषित केला त्यामुळे रोजगार व कामधंदे पूरते बंद असल्याने अनेक आदिवासी कुंटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. . आधिच घरात आठराविश्व दारिद्रय त्यात आदिवासींना खायची भ्रांत, परंतु महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने आज पर्यंत एक दमडीही आदिवासींना दिलीे नसल्याने, शिवाय महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने खावटी अनुदानाचे परिपञक ९ सप्टेंबरला काढले असताना, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. या विभागाने गेली दोन वर्ष कातकरी कुंटुंबांचा फक्त सर्वे करण्यात घालवली असून आजपर्यंत 16,70000 /रुपये या सर्व्हेवर खर्च झाल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. तसेच आदिवांसीच्या मुलांना लाॕकडाऊन मधे शाळा बंद असताना शिक्षणासाठी  कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे मुलं शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. अशक्य असणारे आॕनलाईन शिक्षणापासून ही मुले आजही दूरच आहेत .


                   अशा मृत पावलेल्या व संवेदना बोथड झालेल्या आदिवासी विभागाचा निषेध करण्यासाठी श्रमजीवी संघटना मुरबाड तालुका यांनी आज मुरबाड तहसिल कार्यालयाच्या प्रवेश द्वारावरच तरुणांनी मुंडन करुन  तेराव्याचा  विधी उरकून अनोखे आंदोलन केले व मुरबाड तहसिलदार यांना निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधले. या वेळी श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट् उपाध्यक्ष गणपत हिलम, तालुका अध्यक्ष वसंत मुकणे, तालुका सचिव दिनेश जाधव ,कातकरी घटक सचिव पंकज वाघ, महिला तालुका अध्यक्षा हिरा खोडका व आदिवासी उपस्थित होते. कोरोना संकटात शासनाचे नियम पाळून ५0 पेक्षा कमी आदिवासी सामिल झाले होते.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...