Sunday 27 September 2020

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे उशीद येथील शेतकर्‍यांची बरबादी, घरांना तडे तर शेतीचे नुकसान !

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे उशीद येथील शेतकर्‍यांची बरबादी, घरांना तडे तर शेतीचे नुकसान !


कल्याण (संजय कांबळे) : माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी असा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या बोगद्याच्या कामासाठी करण्यात येणा-या भू सुंरग मुळे कल्याण तालुक्यातील उशीद गावातील अनेक शेतकऱ्यांच्या घरांना तडे गेले आहेत तर या रस्त्याशेजारील भातशेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या कडे केली आहे.


ठाणे जिल्ह्यातील अनेक गावातून मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जातो, माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी असा हा महामार्ग असून यामुळे काही तासातच मुंबई हुन नागपूर ला पोहचता येणार आहे. हा मार्ग ठाणे जिल्ह्यातील कल्याण भिवंडी शहापूर आदी तालुक्यातून पुढे जातो. प्रारंभी भू संपादनाच्या वेळी कल्याण तालुक्यातून याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. अनेक शेतकऱ्यांवर पोलीस केसेस झाल्या होत्या. जमीनीचा वाढीव मोबदला मिळाल्या नंतर हे अंदोलन निवळले होते. यांनतर ख-या अर्थाने समृद्धीचा मार्ग मोकळा झाला व कामाला सुरुवात झाली. काही ठिकाणी काम पुर्ण व्हायला आले आहे तर काही भागात अद्याप सुरू आहे. असेच कल्याण तालुक्यातील उशीद गावाच्या हद्दीत उशीद आणि शहापूर तालुक्यातील अंबार्जे यांना जोडणाऱ्या बोगद्याचे काम सुरू आहे. साधारण पणे ५५० मीटर लांबीचा हा बोगदा असून डोंगर फोडण्यासाठी मोठ्या क्षमतेचा व अधिक तीव्रतेचा ब्लास्टींग केले जाते. यामुळे येथून जवळच असलेल्या टोपलेवाडी, हल आणि उशीद येथील सुरेश गायकवाड, सतिश श्रीपती भोईर, हल येथील शाम लक्ष्मण भाकरे, अशा ४०/५० शेतकऱ्यांच्या  घरांना तडे गेले आहेत. भिंतीना भेगा पडल्या आहेत तर अनेकांचे पत्रे फुटले आहेत. हा ब्लास्टींग इतका तीव्रतेचे असतो की या गावामध्ये काही काळ भूंकप आल्यासारखे वाटते.. प्रत्येक घर हादरून जाते. यातून उडणारी धूळ व कपची मुळे रस्त्याच्या बाजूला असलेली भातशेती नापीक होते की काय अशी भीती वाटत असल्याचे येथील शेतकर्‍यांनी सांगितले. त्यामुळे या विरोधात नुकसान भरपाई मिळावी म्हणून सतीश भोईर, शाम भाकरे, सुरेश गायकवाड, आदी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत उशीद अरेला, तसेच तहसीलदार दीपक आकडे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या कडे तक्रार अर्ज केले आहेत परंतू अद्यापही काही झाले नाही.
तर उशीद अरेला ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण भोईर, ग्रामसेवक विलास मिरकुटे यांनी ग्रामस्थांनी केलेल्या अर्जानुसार गावातील बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेऊन मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे डेप्युटी इंजिनिअर आणि एम एस आरडीचे अधिकारी यांना म्हणणे पोहोचवले आहे. त्यामुळे लवकरच मदत होईल असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
दरम्यान विकास जरुर झाला पाहिजे, वेळ आणि पैसा वाचवणारा समृद्धीचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण व्हायलाच हवा. पण  तूमची समृद्धी होताना शेतकऱ्यांची बरबादी होता कामा नये याचे भान ठेवायला हवे!
*प्रतिक्रिया ", मी याबाबतीत आमच्या डेप्युटी इंजिनिअरला सर्व्हे करायला सांगितले आहे रिपोर्ट येताच दुरुस्ती करुन देण्यात येईल", मुक्तेश वाडेकर, वरिष्ठ अधिकारी, एम एस आरडीसी. ठाणे.
*श्री कांबळे (डेप्युटी इंजिनिअर - समृद्धी महामार्ग) उशीद गावातील बाधित शेतकऱ्यांना भेट दिली आहे. १०/१२ लोकांच्या घरांना तडे गेले आहेत त्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल.
+विलास मिरकुटे,ग्रामसेवक, ग्रामपंचायत उशीद अरेला ता कल्याण.
"ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या नंतर त्या संबंधित अधिकारी व विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत."
*सुरेश गायकवाड - बाधित शेतकरी, उशीद
"अगोदर आमच्या जमीनी कवडीमोल भावाने समृद्धी महामार्गात घेतल्या. आता त्यांच्यामुळेच घरांना प्रचंड तडे, भेगा पडल्या आहेत. घर कोसळले की संपले सारे ". 

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...