Friday 25 September 2020

कल्याण - मुरबाड रेल्वे मार्गाचे 50 वर्षाचे स्वप्न पूर्ती करण्याची खासदार कपिल पाटील यांची लोकसभेत मागणी !!

कल्याण - मुरबाड  रेल्वे मार्गाचे 50 वर्षाचे स्वप्न पूर्ती करण्याची खासदार कपिल पाटील यांची लोकसभेत मागणी !!


मुरबाड {मंगल डोंगरे} : मुरबाड तालुक्यातील नागरिकांकडून 50 वर्षांपासून रेल्वेची वाट पाहिली जात असून, मुरबाडमधील जनतेचे स्वप्न साकार करण्यासाठी कल्याण-मुरबाड रेल्वेचे काम लवकर सुरू करावे, अशी आग्रही मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी काल बुधवारी लोकसभेत केली.


     भारतीय रेल्वेचे जनक असणारे  नाना शंकरशेठ यांचे मुरबाड हे गाव आहे. मात्र, मुरबाडपर्यंत रेल्वे सुरू होण्यासाठी मुरबाडवासीय 50 वर्षांपासून वाट पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पीयुष गोयल, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाला मंजुरी दिली. त्या निर्णयाने हजारो मुरबाडवासीयांना दिलासा मिळाला. सध्या या रेल्वेमार्गाचा अंतिम प्रकल्प आराखडा (डीपीआर) नीती आयोगाकडे लवकरच मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. मुरबाडवासियांचे पाच दशकांचे स्वप्न साकार करण्यासाठी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी काल लोकसभेत तातडीने सार्वजनिक महत्त्वाच्या विषयांवर लक्ष वेधण्याच्या नियमानुसार केली.
   मुरबाड रेल्वेने जोडताना यापूर्वी   कल्याण -मुरबाड - नगर रेल्वे ,यानंतर मुरबाड  - कल्याण उपनगरी रेल्वे , तर मधल्या काळात कल्याण -टिटवाळा मार्गे - मुरबाड अश्या रेल्वे मार्गाच्या चर्चा येत होत्या. तर मागील काही महिन्यांपूर्वी खासदार कपिल पाटील यांनी मुरबाड रेल्वे चा आराखडा तयार होऊन नीती आयोगाला सुपूर्द केल्याचेही जाहीर केले होते .त्यामुळे मुरबाड रेल्वे लवकर मार्गी लागेल असे वाटत असताना पुन्हा एकदा लोकसभेत खासदार कपिल पाटील यांनी मागणी करताना नीती आयोगाला प्रस्ताव देणार असल्याचे सांगितले , मुरबाड रेल्वे ने जोडल्यास मुरबाड मधील बेरोजगारी कमी होऊ शकते , प्रवासाचा निम्मा खर्च कमी होऊन आर्थिक स्थिती सुधारू शकते त्या मुळे मुरबाड कर गेली 50 वर्ष प्रतीक्षा करत असून राजकारणाच्या गर्तेत सापडलेला हा प्रकल्प मार्गी लागला पाहिजे अशी मुरबाड करांची अपेक्षा आहे त्यामुळे  खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत नव्याने आठवण करून दिल्याने मुरबाड करांनी आभार मानलेत 
    कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी 962 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारतर्फे 50 टक्के खर्च उचलण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या रेल्वेमार्गासाठी खासदार कपिल पाटील यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. तर मुरबाड करही सातत्याने मागणी लावून धरत आहेत.त्यात पुन्हा एकदा भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार कपिल पाटील लोकसभेत शुन्य प्रहारात ह मुद्दा उपस्थित केल्याने मुरबाड करांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...