Thursday, 24 September 2020

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण !

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण !


ठाणे : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोनाची लागण झाली आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या आधी मंत्रीमंडळातील सहकारी जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख यांना पण करोनाची लागण झाली होती. यातून ते बरे झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनाही करोनाची लक्षणं जाणवल्यानंतर करोनाची चाचणी केली त्यानंतर एका दिवसात या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती ठिक असून गेल्या काही दिवसांत त्यांच्या सपंर्कात आलेल्या व्यक्तींनी करोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी  कुर्ला पश्चिम (प्रतिनिधी) –ता.12 संत ज्ञा...