Thursday 24 September 2020

माणगांव मध्ये प्लास्टिक युक्त कृत्रिम धोकादायक अंड्यांची विक्री ? संबंधित विभागाने लक्ष द्यावे...

माणगांव मध्ये प्लास्टिक युक्त कृत्रिम धोकादायक अंड्यांची विक्री ? संबंधित विभागाने लक्ष द्यावे... 


     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) सद्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोना विषाणूचे समूळ उच्चाट करण्यासाठी शासन सर्वोतोपरी अथक प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने मानवी संचार स्वातंत्र्यावर लावलेले निर्बंध लॉकडाऊन या सर्व गोष्टींमुळे लोकांची फार मोठी कुचंबणा होत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नागरीकांनी पौष्टिक आहार घेतला पाहिजे. त्या साठी नागरिकांनी आपल्या दैनंदिन आहारात ताज्या पालेभाज्या, फळे, मच्छी मटण आणि अंड्यांचा समावेश करावा असे शासनाने निर्देश दिले आहेत. 
     या सर्व वस्तू घेण्यासाठी लोकांना बाजारात तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते त्यामुळे बाजारात गर्दी होते. गर्दीमुळे होणारा कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लोक आपापल्या गावातील जवळच्या दुकानातून अंडी विकत घेऊन आपल्या दैनंदिन आहारात अंड्यांचा समावेश करतात. 
     मात्र माणगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील दुकानात उपलब्ध असलेली अंडी कृत्रिम आणि प्लास्टिक युक्त घातक पदार्थांच्या मिश्रणातून बनवलेली आढळून येत आहेत. 
    सदरचा प्रकार रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील बोरघर गावचे पत्रकार विश्वास गायकवाड यांनी त्यांच्या गावातील दुकानातून विकत आणलेल्या अंड्यांच्या माध्यमातून निदर्शनास आला आहे. 
     या बाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे बोरघर गावातील पत्रकार विश्वास गायकवाड यांनी मंगळावर दिनांक २२ सप्टेंबर रोजी बोरघर गावातील श्री रामदास जाधव यांच्या दुकानातून विकत आणलेली एक डझन अंडी उकडल्या नंतर ती सोलून पाहिल्यावर त्यांच्या निदर्शनास आले की सदरची अंडी ही नेहमीप्रमाणे नसून ती सकृतदर्शनी कृत्रिम स्वरूपाची दिसून आली. सदर उकळून शिजवलेल्या अंड्यांमध्ये एकाखाली एक अशी प्लास्टिक युक्त आवरणे दिसून आली. तसेच सदरची अंडी पूर्णपणे बेचव लागत होती. म्हणून त्यांनी तात्काळ ती अंडी सदर दुकानदाराला नेऊन दाखवली. दुकानदाराने त्यांना अंडी बदलून देतो म्हटले. या गोष्टीला पत्रकार विश्वास गायकवाड यांनी नकार देत सदर दुकानदाराला विचारले की, तुम्ही सदरची अंडी कोणाकडून आणली त्यांनी सांगितले की, मी सदरची अंडी माणगांव शहरातील बामणोली रोड येथील अंड्यांचे घाऊक विक्रेते श्री. जगताप यांच्या कडून आणली. पत्रकार विश्वास गायकवाड यांनी संबंधित अंडी विक्रेते जगताप यांचा मोबाईल नंबर दुकानदार रामदास जाधव यांच्या कडून घेतला. सदर माणगांव शहरातील घाऊक अंडी विक्रेते श्री जगताप यांच्या ९४०३०६६१०० या नंबर वर फोन करून त्यांना सदरचा प्रकार सांगितला. ते म्हणाले मी सांगली येथील लोटके या अंडी एजन्सी वाल्या कडून अंडी घेतो. तरी सदर बाब अत्यंत गंभीर असून निष्पाप नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम घडवून आणणारी आहे त्यामुळे सदर प्रकरणी संबंधित नियंत्रण विभागाने गांभिर्याने लक्ष केंद्रित करून सदर प्रकरणी अधिक चौकशी करून सत्यता पडताळणी करीता परिक्षण करावे हीच अपेक्षा.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...