Monday 28 September 2020

पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीचा दणका, मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे अधिकारी उशीद गावात?

पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीचा दणका, मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे अधिकारी उशीद गावात?


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील उशीद गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पत्रकार संजय कांबळे यांनी विविध वृत्तपत्रातून मांडल्याने खडबडून जागे झालेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे अधिकारी आज दुपारी उशीद गावात धडकले. त्यांनी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घरांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी असा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग भाजपा सरकारच्या काळात सुरू केला एकूण ७१० किलोमीटर लांब आणि १२० मीटर रुंद असलेल्या या महामार्गात १० जिल्हे, ३० तालुके आणि ३२४ गावे बाधित झाली असून कल्याण शहापूर आणि भिवंडी या तालुक्यातील सुमारे ४४ गावे बाधित होत आहेत. यामध्ये कल्याण १०, शहापूर २७, आणि भिवंडी ७, गावाचा समावेश आहे. कोरोनोच्या अगोदर बाधित झालेल्या क्षेत्राचा मोबदला काही शेतकऱ्यांना मिळाला तर बहुतेक शेतकऱ्यांच्या या ना त्या कारणाने हरकत आहे त्यांचे पैसे अद्याप पर्यंत मिळाले नाही. त्यातच कोरोना आला हेंरिंग थांबल्या, त्यामुळे शेतकरी "दमडी" साठी मोहताज झाले आहेत. अशातच उशीद ग्रामपंचायत हद्दीत आंबाजे गावाला जोडणारा बोगद्याचे काम सुरू झाले. डोंगराच्या कुशीत ब्लास्टिंग करून हा मार्ग तयार करण्यात येत असल्याने या स्फोटामुळे टोपलेवाडी, हल आणि उशीद गावातील शेतकऱ्यांच्या घरांना तडे गेले, भेगा पडल्या आहेत. गावातील सुरेश शंकर गायकवाड यांच्या "आवास" योजनेतून बांधून दिलेल्या नवीन घराला तडे गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आभाळच कोसळले आहे 
दरम्यान गावातील सतीश श्रीपती भोईर, शाम भाकरे आदी शेतकऱ्यांनी सरपंच, ग्रामसेवक उशीद, तहसीलदार कल्याण, आणि जिल्हाधिकारी ठाणे यांना तक्रार निवेदन दिले. सरपंच प्रवीण भोईर, आणि ग्रामसेवक विलास मिरकुटे यांनी तात्काळ शेतकऱ्यांचे हे अर्ज समृद्धी महामार्गाचे अधिकारी व एम एस आरडीचे अधिकारी यांच्या कार्यालयात पाठवले 
मे २०२० मध्ये केलेल्या तक्रारीला आज ५/६ महिने होत आहेत. पण कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होत नसल्याने गावातील तरुण सतीश भोईर यांनी पत्रकार संजय कांबळे यांच्या कडे शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा पाडा वाचला. त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या बाबतीत विचारना केली व विविध वृत्तपत्रातून शेतकऱ्यांची बाजू मांडली. सकाळी बातम्या प्रसिद्ध होताच मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे डेप्युटी इंजिनिअर श्री कांबळे, चंद्रशेखर नामक अधिकारी व ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण भोईर यांनी गावात फिरुन बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या घरांना भेटी दिल्या. तसेच ज्या भागांना भेगा पडल्या आहेत. त्याचे फोटो देखील काढले आहेत. यावेळी उपस्थित बाधित शेतकरी सुरेश गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना घरांचे तडे गेल्याचे दाखवत असताना हे किरकोळ आहे. तूम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही असे सांगितलं त्यामुळे शेतकरी संतापले. हा प्रकार म्हणजे आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. 
तथापि सध्याचा काळ हा कोरोना चा आहे सर्व उद्योग धंदे, ठप्प झाले आहेत बाजार, मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांना पैसा मिळत नाही, अशात त्यांच्या तोंडातील घास वादळी पावसाने हिराऊन घेतला आहे अशा नाजुक परिस्थितीत समृद्धी च्या अधिका-यांनी शेतकऱ्यांना मदत देऊन आधार द्यायला हवा. असे तोडून बोलने योग्य होणार नाही व ते आपल्याला ही शोभणारे नाही याचा विचार करायला हवा, कारण बळीराजा जगला तर देश जगेल याचा विचार करा.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...