Wednesday, 23 September 2020

कल्याण - मुरबाड तालुक्यात मुसळधार पाऊस उभे भातपिक आडवे कोरोनाच्या काळात नवे संकट?

कल्याण - मुरबाड तालुक्यात मुसळधार पाऊस उभे भातपिक आडवे कोरोनाच्या काळात नवे संकट? 


कल्याण (संजय कांबळे) : गेल्या दोन दिवसांपासून कल्याण आणि मुरबाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे हातातोंडाशी आलेले भात पीक आडवे झाले आहे. त्यामुळे अगोदर कोरोनोच्या संकटामुळे अर्धमेले झालेले शेतकऱ्यांची अवस्था राजाने मारलं आणि निसर्गाने झोडले तर न्याय कोणाकडे मागायचा अशी झाली आहे.


कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप कांबा ही गावे सोडली तर बहुतेक गावात भात पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. मुरबाड आणि शहापूर तालुक्याला तर तांदूळाचे कोठारच म्हटले जाते. 2020 हे वर्ष  सर्वांनाच धोकादायक व सत्वपरीक्षेचे ठरले आहे. ऐन भात लावणीच्या वेळी कोरोनाने डोके वर काढले. शेतीच्या कामांना मजूर मिळेना तरीही  शेतकऱ्यांनी घरातील सर्व लहान थोर सदस्यांना घेऊन भात लावणी उरकली. उशीराका होईना पाऊस चांगला पडल्याने भात पीक चांगले आले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतातील कामे म्हणावी तशी पुर्ण झाली नाही पण तरीही भात पीक चांगले आल्याने शेतकरी आंनदी होता. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची दु:खात ही चांगले पीक आल्याचे समाधान वाटत होते. काही शेतकऱ्यांनी तर दसरा दिवाळीत भात कापणी करण्यासाठी बांबूचे बांद बनविण्याचे काम सुरू केले आहे. पण येथेही काळाने डाव साधला. गेल्या दोन ते चार दिवसांपासून कल्याण आणि मुरबाड तालुक्यात मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. यामुळे काही दिवसानंतर कापणी ला येत असलेले भात पीक आडवे झाले आहे कल्याण तालुक्यातील फळेगाव, रायते, मानवली, घोटसई, दहागाव, खडवली, उशीद, आपटी, तर शहापूर तालुक्यातील मड, आंबार्जे, वाशिंद, शेरे, शेई, नडगाव, तर मुरबाड तालुक्यात शिरगाव, चिखले, मानवली, उमरोली, धसई आंबेटेंभे, झापवाडी, पाद-याचा पाडा, धानिवली, ब्राह्मणगाव, म्हसा, कान्होळ आदी ठिकाणी भात पीक पडल्याची माहिती मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. वरूणराजाने आता कृपादृष्टी करावी व शिल्लक राहिलेले पीक तरी आमच्या पदरात पडावे अशी विनवणी बळीराजा करित आहे. 

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...