Wednesday 23 September 2020

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी या साठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदारांना निवेदन !!

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी या साठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदारांना निवेदन !!


        बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना शासनाच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीचा घाट घातला जात आहे. हा सरळसरळ मराठा समाजावर अन्याय करणारा निर्णय ठरू शकतो. त्यामुळे जो पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत शासनाने राज्यात कोणत्याही खात्याची भरती करू नये या प्रमुख मागणी साठी  संभाजी ब्रिगेड रायगड जिल्ह्याच्या वतीने माननीय माणगांव तहसीलदार यांना जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या समवेत लेखी निवेदन देण्यात आले. 
       या प्रसंगी जिल्हाध्यक्ष शिवश्री भूषण राजाराम शिसोदे,जिल्हा सचिव शिवश्री पृथ्वीराज खाडे ,शिवश्री अनिकेत कांबळे संघटक, तालुकाध्यक्ष संदिप रेके,उपाध्यक्ष शिवश्री अजित सुतार यांच्या सह संभाजी ब्रिगेडचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 
       शासनाने मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना जर पोलीस भरती केली तर तो शासनाचा निर्णय राज्यातील मराठा समाजावर किंबहूना मराठा समाजातील तरुणांवर अन्यायकारक होईल असे होऊ नये म्हणून शासनाने जनभावना लक्षात घेऊन पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करावी या प्रमुख मागणी साठी संभाजी ब्रिगेड रायगड जिल्ह्याच्या वतीने बुधवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी माणगांव तहसीलदार माननीय प्रियांका आयरे मॅडम यांच्या माध्यमातून शासनाला देण्यात आले.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...