Wednesday, 23 September 2020

गोरेगाव,नांदवी येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांचा सक्रिय सहभाग !

गोरेगाव,नांदवी येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांचा सक्रिय सहभाग !


      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) सध्या रायगड जिल्ह्यासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत असतानाच मृत्यूच्या आकडेवारीत भर पडत आहे. वाढता मृत्यूदर नियंत्रणात यावा, यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम राज्यात दिनांक १५ सप्टेंबर ते होत्या२५ ऑक्टोबर दरम्यान राबविण्याचा निर्णय घेतला. 
       त्यानुसार संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिनांक १५ सप्टेंबर पासून स्थानिक लोकप्रतिनिधी,आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी यांच्यासह, सामाजिक क्षेत्रातील स्वयंसेवक यांच्या माध्यमातून या मोहिमेस जोरदारपणे सुरुवात करण्यात आली. दरम्यान या मोहिमेस जनतेकडून कसा प्रतिसाद मिळतो, याची चाचपणी करण्यासाठी बुधवार, दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी गोरेगाव,नांदवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन आढावा घेतला. तसेच ठिकठिकाणी सुरू असलेल्या मोहिमेत स्वत: सहभागी झाले. त्यांनी घरांना भेटी देत कोविड - १९ विषयी जनजागृती केली व प्रत्यक्षात थरमल स्कॅनर, ऑक्सिमीटरद्वारे घरातील सदस्यांची आरोग्य  तपासणी केली.
  या वेळी डॉ.पाटील यांच्यासोबत गटविकास अधिकारी सतीश गाढवे,माणगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.परदेशी, गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद गोरेगावकर, स्वदेस फाऊंडेशनचे महाव्यवस्थापक तुषार इनामदार, स्वदेस फाऊंडेशनचे व्यवस्थापक डॉ.सचिन अहिरे, गोरेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच विनोद बागडे, आरोग्य सेविका सौ.प्रणिता मोहिरे, ग्रामपंचायत सदस्य किशोर पिसाट, आशा वर्कर उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

सिद्धार्थ महाविद्यालयात व्यवसाय संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न‌ !

सिद्धार्थ महाविद्यालयात व्यवसाय संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न‌ ! मुंबई, (पंकजकुमार पाटील) : पिपल्स ए...