Sunday 30 September 2018

महात्मा गांधी जयंतीला उपवासास बंदी

गांधी जयंतीदिनी उपवासालाही सरकारची बंदी. 

लोकांचे दोस्तचा ईव्हीएमविरोधी  सामूहिक उपवास कार्यक्रम दडपण्याचा सरकारचा प्रयत्न  

  मुंबई दि 28 ( प्रतिनिधी )
             "लोकांचे दोस्त" संघटने तर्फे येत्या २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ईव्हीएम विरोधी सामुहिक उपवास कार्यक्रमाला सरकारने परवानगी नाकारली आहे. गांधी जयंती दिनी ' उपवास ' करून सरकार विरुद्ध बोलता येणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. तर उपवासालाही बंदी घालणारे सरकार सरळ सरळ आणीबाणीच का घोषित करत नाही, असा सवाल लोकांचे दोस्त संघटनेचे अध्यक्ष रवि भिलाणे यांनी केला आहे.  
               लोकांचे दोस्तांच्या वतीने 2 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत जुहू चौपाटीवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर सामूहिक उपवास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र स्थानिक सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांनी रवि भिलाणे, काशिनाथ निकाळजे आणि सतशील मेश्राम यांच्या वर कार्यक्रम करू नये म्हणून नोटीस बजावली आहे. तसेच अटक करण्याचा इशाराही दिला आहे. मात्र उपवास करण्याला बंदी का ? या प्रश्नाचे उत्तर पोलिसांनी दिलेले नाही. सरकार विरुद्ध बोलता येणार नाही असाच पोलिसांचा पवित्रा असल्याचे दोस्तांनी स्पष्ट केले. मात्र सरकार ने कितीही दबाव टाकला तरीही ईव्हीएम विरोधी उपवास करणारच असा निर्धार लोकांचे दोस्तांनी व्यक्त केला आहे.
      
संपर्क: रवि भिलाणे,9892069941
काशीनाथ निकाळजे,9322239222
सतशील मेश्राम,9833936807

No comments:

Post a Comment

लग्नाची अंतिम बोलणी करण्याआधी पालकांनी मुलाकडे प्रेम प्रकरणाबाबत चौकशी करावी !!

लग्नाची अंतिम बोलणी करण्याआधी पालकांनी मुलाकडे प्रेम प्रकरणाबाबत चौकशी करावी !! कल्याण, प्रतिनिधी :- पालकांनी लग्नाची बोलणी अंति...