Thursday 20 September 2018

तानाजी तात्यांना आदरांजली.

तानाजी तात्यांचे अपुर्ण कार्य व चळवळ पुढे चालू ठेवणे हिच खरी आदरांजली ठरेल  !!
====================
मुरबाड -
श्री. मंगल डोंगरे -
               मराठा सेवा संघाचे कोकण विभागाचे माजी अध्यक्ष तथा मुलुख मैदानी तोफ म्हणजेच तांनाजी तात्या घरत यांचे 10 सप्टेंबर 2018 रोजी आकस्मित निधन झाले आणि मुरबाड तालुक्यासह अखंड मराठा सेवा संघ एका खंद्या विचारांच्या मार्गदर्शकाला पोरका झाला.आज त्यांचा स्म्रुतीशेष आदरांजली चा कार्यक्रम कुणबी भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी तात्यांच्या आपल्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत तात्यांची प्रचंड इच्छा असलेले कार्य आणि चळवळ पुढे चालू ठेवणे हिच खरी तात्यांना आदरांजली ठरेल असे अनेकांनी आपल्या शोक संदेशात व्यक्त केले.
           शासकीय सेवेत असलेले तानाजी घरत अर्थात तात्या यांचा आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा 1990 च्या दशकातील संपर्क म्हणजेच मुरबाड तालुक्यात पडलेली परिवर्तनाची एक ठिणगी.आणि तात्यांनी स्वतःला समाज कार्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत वाहून घेतले.मराठा सेवा संघाच्या चळवळीतुन त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र भर समाजातील अनिष्ठ रुढी-परंपरावर घणाघात केला.ब्राम्हणी विचाराने बुरसटलेल्या लोकांना प्रवाहात आणुन एक दिवसीय सामुदायिक विवाह पद्धतीनेे अनेकांना कर्मकांडातुन बाहेर काढले.व गावागावात तरुण मंडळी उभी करून अनेक लढे उभारले. कुणबी सेना, कुणबी समाज संघटना, परमार्थिक शेतकरी समाज,या मार्फत ही तात्यांनी प्रबोधनाचे मोठे काम उभे केले.तात्यांचे विचार, अपुर्ण कार्य आणि त्यांची चळवळ पुढे सतत चालू ठेवणे,हिच खरी तानाजी तात्या घरत यांना आदरांजली ठरेल असे अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना व्यक्त केले.यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातुन तात्यांचे समर्थक उपस्थित होते.ज्यांनी तात्यां पासुन विचार आणि प्रेरणा घेवून आपल्या कार्याला सुरुवात केली.आणि चळवळीत सहभागी झाले.ते तात्यांच्या जाण्याने पोरके झाले असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.तात्यांनी आपला देहदान केला होता.मात्र ऐनवेळी शितपेटी उपलब्ध नसल्याने अग्नी संस्कार करण्यांत आले.पुढे तिस-या दिवशी राख सावरल्या नंतर कोणतेही कार्य करु नये असे त्यांचे म्हणण्यानुसार त्यांच्यख मुलांनी,भाऊ बंदानी कोणतेही कार्य न करता थेट आदरांजली चा कार्यक्रम ठेवला होता.या श्रद्धांजली साठी अनेक समाजातुन,संघटनांतुन त्यांचे चाहते हजारोंच्या संख्येने मुरबाड येथील कुणबी समाज भवन येथे हजर होते. तात्यांच्या आठवणी कायम राहव्यात यासाठी पालघर येथे वाचनालय सुरू करण्याचे पालघर जिल्हा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्षानी सुचित केले.तखत्यांनी कधीच खोट्या प्रतिष्ठेवर विश्वास ठेवला नाही,ना पैशावर कधी प्रेम केले.परखड विचारांचे ज्वलंत अग्नीकुंड असलेले तात्या आपल्या विचाराने,कार्याने अमर झाल्याचेही अनेकांनी यावेळी सांगितले.





No comments:

Post a Comment

लग्नाची अंतिम बोलणी करण्याआधी पालकांनी मुलाकडे प्रेम प्रकरणाबाबत चौकशी करावी !!

लग्नाची अंतिम बोलणी करण्याआधी पालकांनी मुलाकडे प्रेम प्रकरणाबाबत चौकशी करावी !! कल्याण, प्रतिनिधी :- पालकांनी लग्नाची बोलणी अंति...