Tuesday 29 March 2022

ठाण्यात सांडपाण्याची टाकी साफ करताना योग्य खबरदारी "न" घेतल्याने दोघा मजुरांचा मृत्यू !! "हि दुसरी घटना"

ठाण्यात सांडपाण्याची टाकी साफ करताना योग्य खबरदारी  "न" घेतल्याने दोघा मजुरांचा मृत्यू !! "हि दुसरी घटना"


भिवंडी, दिं,३०, अरुण पाटील (कोपर) :
            ठाणे महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंब्रा भागात कौसा स्टेडियमजवळील एका सोसायटीच्या सांडपाणी प्रक्रिया टाकीची साफसफाई करताना सुरक्षेच्या दृष्टीने योग्य खबरदारी "न" घेतल्याने दोन मजूरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आता या प्रकारणात चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
             ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात टाकी साफ करताना कामगारांच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. याआधी रविवारी ठाण्यातील हरिनिवास सर्कल जवळील चार मजली इमारतीच्या टाकीची साफसफाई करताना दोन मजुरांचा मृत्यू झाला, तर दोन मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
            काल सायंकाळी मुंब्रा येथील कैसा स्टेडियमजवळील ग्रेस स्क्वेअर सोसायटीच्या आवारात हनुमान विकांती कोरपकवड (वय २५) व सूरज राजू माधवी (वय २२, दोघे रा. डोंबिवली) सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी खाली उतरले होते. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दोघेही टाकीतून बाहेर न आल्याने सोसायटीतील लोकांनी खाली पाहिले. दोघेही कामगार बेशुद्ध अवस्थेत होते. दोघांनाही तातडीने जवळच्या प्राईम क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दोन्ही मजुरांना मृत घोषित केले. त्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. सुरवातीला अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करून तपास केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
          रविवारी दोन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर अद्याप कोणताही गुन्हा पोलिसांनी दाखल केला नसून, या संदर्भात चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...