Tuesday 29 March 2022

लाऊडस्पीकरने होणारी अजान बंद करा व सण साजरे करण्यासाठी परवानगी द्या - भाजपची मागणी.

लाऊडस्पीकरने होणारी अजान बंद करा व सण साजरे करण्यासाठी परवानगी द्या - भाजपची मागणी.


भिवंडी, दिं,३०, अरुण पाटील (कोपर) :
                राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आल्यापासून हिंदू नाराज असून, हिंदूंच्या  सणांवर निर्बंध घालून हिंदूंच्या आनंदावर विर्झन घालण्याचं काम केलं असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. त्यातच आता गुढी पाडव्याला निघणाऱ्या शोभा यात्रेसाठी, राम नवमीच्या मिरवणुका काढण्यासाठी आणि सण जल्लोषात साजरे करण्यासाठी परवानगी द्या, या साठी भाजपच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेवून निवेदन दिले आहे.
              भाजपने यावेळी मशिदीमधून अजानमुळे मुंबईकर नाराज असल्याचं देखील सांगितले आहे. ध्वनि प्रदूषण रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात, मात्र ध्वनि प्रदूषणाचं मोठं कारण हे मशिदीवरून लाऊड स्पीकरने दिली जाणारी अजान असल्याचं मत भाजपच्या शीष्ट मंडळाने यावेळी व्यक्त केले. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार राहुल नार्वेकर आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
              भाजपकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २ एप्रिल रोजी हिंदू नववर्षानिमित्त अनेक ठिकाणी यात्रेचं आयोजन केलं जातं. अशा यात्रेच्या स्वागतासाठी मुंबईत तयारी सुरु आहे. त्यामुळे या यात्रेला परवानगी द्यावी. तसंच रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि हनुमान जयंती हे सण साजरे करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी देखील या वेळी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...