Wednesday 30 March 2022

अवैध रेती उपसा करणाऱ्या विरोधात कल्याण डोंबिवलीत कारवाई !!

अवैध रेती उपसा करणाऱ्या विरोधात कल्याण डोंबिवलीत कारवाई !!


कल्याण, बातमीदार : खाडी परिसरात नेहमीच मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने रेती उपसा होत असते. मंगळवारी दुपारी वाळू उपसा करत असलेल्या रेती माफियांवर तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने कारवाई केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


कल्याणमधील दुर्गाडी रेतीबंदर आणि डोंबिवली येथील मोठा गाव रेतीबंदर परिसर या दोन्ही ठिकाणी अवैध रेती उपसा सुरु होता. या दोन्ही ठिकाणी रात्रीच्या सुमारास ड्रेजर्स आणि बाजने रेती उपसा केला जात होता. शेकडो ब्रास काढण्यात आलेली रेती रातोरात हलविली जात होती. रेती उपसा करणारे ड्रेजर्स, बाज, बोटी या खाडीच्या पाण्यात मध्यभागी ठेवल्या जात होत्या. त्यामुळे त्या कळून येत नव्हत्या. त्याची माहिती कल्याणच्या तहसीलदारांना मिळताच त्यांनी कारवाई पथकासह धाड टाकली. थेट खाडीत बोटीने पाहणी करीत असताना त्यांना याठिकाणी अवैध रेती उपसा आढळून आला.

तहसीलदारांच्या कारवाई पथकाने रेती उपसा करणाऱ्या बोटीच्या दिशेने धाव घेतली. पथक उपसा करणाऱ्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून बोटीवरील कामगारांनी प्रथम प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाचा आक्रमक पावित्र पाहून कामगारांनी खाडीच्या पाण्यात उड्या घेत पळ काढला. कारवाई पथकाने सात रेती उपश्याचे पंप, दोन बाज, रेतीची आठ कुंड या पथकाने नष्ट केली आहे. कारवाई दरम्यान जप्त केलेली शेकडो ब्रास रेती पुन्हा खाडीत सोडण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...