Tuesday 29 March 2022

अखेर म्हारळ पोलिस चौकीचे नामकरण(बारसे)झाले, नवीन चौकीतून कामकाज सुरू! पुर्ण वेळ अधिका-याचे काय ?

अखेर म्हारळ पोलिस चौकीचे नामकरण(बारसे)झाले, नवीन चौकीतून कामकाज सुरू! पुर्ण वेळ अधिका-याचे काय ?


कल्याण, (संजय कांबळे) : शिवसेना पदाधिकारी व तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यातील प्रंचड शाब्दिक वाक् युद्धा नंतर गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या म्हारळ पोलिस चौकीचे अखेर नुकतेच नामकरण (बारसे) पार पडले असून आता नवीन चौकीतून कामकाज सुरू झाले आहे. परंतु काही मोजकेच अधिकारी सोडले तर या चौकीस पुर्ण वेळ अधिकारी काय लाभले नाही, त्यामुळे आता तरी ही परिस्थिती बदलणार का? की 'येरे माझ्या मागल्या' असे होणार याबाबत परिसरात चर्चा आहे.


कल्याण तालुक्यातील म्हारळ हे गाव सर्वाधिक लोकसंख्या असलेले मोठे गाव/ शहर आहे, याच बरोबर लागूनच असलेली वरप कांबा या गावाची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. यामुळे येथील कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. गुन्हेगारी वाढत आहे. हे सगळं नियंत्रित ठेवण्यासाठी एमआयडीसी रोड समोर म्हारळ पोलीस चौकी २०/२५ वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आली. या चौकीला अनेक पोलीस अधिकारी येवून गेले. पण काही मोजकेच अधिकारी सोडलेतर कोणी ही पुर्ण वेळ चौकीला दिला नाही. त्यामुळे वरीष्ठच नाही, तर आम्ही का बसायचे?असे इतर कर्मचाऱ्यांना वाटत असल्याने कोणाचा कोणाला मागमूस राहिला नाही, याचा फायदा गुन्हेगारांनी घेतला,खून,हाणामाऱ्या, मारामारी, बलात्कार, चैन स्नँकिंग, लुटालूट गाड्या तोडफोड आदी प्रकार वाढले,या संदर्भात पोलिसांना विचारले की, अपुरे कर्मचारी हे तुणतुणे वाजलेत म्हणून समजा, परंतु अशाही परिस्थितीत, पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, बालाजी पांढरे, पीएसआय, बंजरग रजपूत आदी नी काही प्रमाणात येथील गुन्हेगारी आटोक्यात आणली. त्यामुळे या म्हारळ पोलीस चौकीने अनेक चांगले वाईट प्रंसग,घटना, पाहिल्या होत्या, पण तरीही या चौकीस साधी नावाची पाटी कधी लागली नाही.

येथे सदैव लोकांचा राबता असायचा, पण पावसाळ्यात, येथे पाणी भरु लागल्याने, तसेच ही चौकी अपुरी पडू लागल्याने, शिवाय पकडलेले आरोपी ठेवण्यासाठी येथे जागा नसल्यामुळे ही चौकी इतरत्र हलवावी, तसेच म्हारळ गावासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे द्यावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करु लागले होते. त्यामुळे सध्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी व म्हारळ पोलीस चौकीचे तत्कालीन पीएसआय यांच्या पुढाकाराने म्हारळ गावाच्या प्रवेशद्वारासमोर नवीन चौकी बांधण्यात आली.

त्यामुळे जुन्या म्हारळ चौकीला कोणीतरी त्रयस्थ व्यक्ती ने टाळा लावला हे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाहताच,तेथे जाऊन चौकीला शिवसेनेचे भगवे झेंडे लावले,व चौकीसमोर खुर्च्या टाकून बसले, परंतु ही वार्ता तालुका पोलीस ठाण्याचे वपोनी राजू वंजारी यांना कळताच ते घटनास्थळी धाव घेतली. व यावेळी शिवसेना पदाधिकारी व त्यांच्यात शाब्दिक वाक् युद्ध झाले. व यातून म्हारळ पोलीस चौकीस,कल्याण तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत म्हारळ पोलिस निवारा केंद्र'असे नामकरण (बारसे) झाले व तसा फलक चौकीवर लागला,

सध्या या नवीन पोलीस चौकीवर कागदोपत्री सुमारे१३ अधिकारी, कर्मचारी नेमणूकीस असल्याचे दिसून येते, परंतु प्रत्यक्षात या चौकीला किती पोलीस अधिकारी व कर्मचारी बसतात, उपस्थित असतात,गुन्हेगारी आटोक्यात येते की नाही? हे येणारा काळच ठरवेल,हे जरी खरे असले तरी, गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या म्हारळ पोलीस चौकीस तिच्या हक्काचे नाव मिळाले हे समाधान कारक आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...