Thursday, 31 March 2022

राज्य सरकारचा निर्णय "महाराष्ट्रात हटवले कोरोनाचे सर्व निर्बंध" ! आपत्ती व्यवस्थापन कायदा रद्द !!

राज्य सरकारचा निर्णय "महाराष्ट्रात हटवले कोरोनाचे सर्व निर्बंध" ! आपत्ती व्यवस्थापन कायदा रद्द !!


मुंबई, बातमीदार : कोरोना निर्बंधांतून महाराष्ट्र मुक्त झाला आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र मास्कचा वापर करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

राज्यातील करोना रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे. नवीन होणारी रुग्णवाढ देखील कमी आहे. तसेच बहुतांश लोकांनी कोव्हिड प्रतिबंधक लस घेतलेली आहे. वेगाने लसीकरण झाल्याने कोरोनाचे संकट बऱ्याच अंशी टळले आहे. त्यामुळे आता कोरोना निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदाही मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे मास्कचा वापर न केल्यास होणारी दंड आकारणीही रद्द होणार आहे. कोरोना निर्बंध शिथिल केले तरी मास्कचा वापर नागरिकांनी करावा यासाठी सातत्याने आवाहन करण्यात येणार आहे. सर्व सण साजरे करणे तसेच मिरवणूकांवर बंदी हटवली.

दरम्यान, मास्कचा वापर हा ऐच्छिक असल्याची माहिती राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ते म्हणाले की, ज्यांना मास्कचा वापर करायचा आहे त्यांनी करावा, नसेल त्यांनी नको. आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले आहेत. 

No comments:

Post a Comment

सिद्धार्थ महाविद्यालयात व्यवसाय संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न‌ !

सिद्धार्थ महाविद्यालयात व्यवसाय संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न‌ ! मुंबई, (पंकजकुमार पाटील) : पिपल्स ए...