Thursday 31 March 2022

आता गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी ॲम्बीस प्रणालीचा होणार वापर --गृहमंत्री, दिलीप वळसे पाटील

आता गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी ॲम्बीस प्रणालीचा होणार वापर --गृहमंत्री, दिलीप वळसे पाटील


भिवंडी, दिं,३१ अरुण पाटील (कोपर) :
          गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांमार्फत ॲम्बीस प्रणालीची मदत घेतली जाणार आहे अशी माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली तसेच आता महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली ही ११२ या क्रमांकावरून तीन स्तरावर काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
          गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आता राज्य पोलिस दलाच्या वतीने ॲम्बीस प्रणालीची मदत घेतली जाणार आहे. सुमारे सहा लाख गुन्हेगारांची छायाचित्रे, बोटांचे ठसे, डोळ्यांचे बुब्बुळ इत्यादीचा एकत्र डेटाबेस हा ॲम्बीस प्रणालीमध्ये उपलब्ध आहे. अशा प्रकारची जागतिक प्रणाली उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असल्याचा दावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.
            ॲम्बीस प्रणालीच्या माध्यमातूनच गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे, हातांचे ठसे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅनिंग साठवण्यासाठी ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम गुन्ह्यांच्या तपासाची गती वाढवणारी ठरेल, असा विश्वास वळसे-पाटील यांनी व्यक्त केला. तसेच या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यास मदत होणार आहे.
            पोलीस दलाने आधुनिकीकरणाची कास धरत आरोपींचे फिंगरप्रिंट घेण्याची कालबाह्य पद्धत आहे. आता केवळ बोटांचे ठसेच नाही तर हातांचे, तळवे, चेहरा आणि डोळ्यांचे स्कॅन करून ते डिजिटल पद्धतीने साठवून ठेवले जात आहेत. यामुळे गुन्हेगारांचा शोध घेणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
             शंभर क्रमांक डायल करून महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीला कळवले जात होते. मात्र आता ११२ हा क्रमांक डायल करून या प्रतिसाद प्रणालीला संपर्क करता येणार आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यापासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या प्रणालीचा गुढीपाडव्याला उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहिती वळसे- पाटील यांनी दिली.
             महाराष्ट्रातील सर्व जिल्हा नियंत्रण केंद्राद्वारे ही प्रणाली वापरली जाणार असून, आतापर्यंत सव्वा लाख लोकांनी या प्रणालीचा वापर केला आहे. पोलिसांकडून दिला जाणारा प्रतिसादाचा वेळ हा दहा ते वीस मिनिटांवर असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे कमीत कमी वेळात तक्रार कर्त्यापर्यंत पोलिसांना पोहोचणे शक्य होत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच तक्रारकर्ता जीपीएसद्वारे ट्रँक केला जात असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होत आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...