Monday, 28 March 2022

शहापूरमध्ये ७० आणि ७२ वर्षांच्या दोन महिलांवर बलात्कार करणाऱ्या २२ वर्षीय भूषण हिंदोळेला अटक !!

शहापूरमध्ये ७० आणि ७२ वर्षांच्या दोन महिलांवर बलात्कार करणाऱ्या २२ वर्षीय भूषण हिंदोळेला अटक !!


भिवंडी, दिं,२८, अरुण पाटील (कोपर) :
        वयाची सत्तरी पार केलेल्या दोन महिलांवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकमेकींच्या शेजारी राहणाऱ्या दोन वृद्ध महिलांवर बलात्कार करण्याऱ्या २२ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. चोरीच्या बहाण्याने घरात शिरलेल्या चोराने दोघींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये  रविवारी हा प्रकार समोर आला. वाशिंद पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
           ७० आणि ७२ वर्षांच्या दोन महिलांवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी २२ वर्षीय भूषण हिंदोळे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तो शहापूरचाच रहिवासी आहे. वाशिंद पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे .
              २० मार्च रोजी भूषणने ७० वर्षीय महिलेच्या घरात घरफोडी केली. त्याच वेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो शेजाऱ्यांच्याही घरात घुसला. तिथे ७२ वर्षांच्या महिलेवरही त्याने लैंगिक अत्याचार केले अशी माहिती पोलिसांनी दिली.
           आरोपी भूषण हिंदोळे याच्यावर बलात्कार आणि इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघी महिलांनी घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजे २३ मार्चला तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २५ मार्चला आरोपीची धरपकड करण्यात आली.

No comments:

Post a Comment

बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न !!

बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न !! ** मा.आ.श्री.किरण पावसकर (शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्...