Sunday 21 February 2021

जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर रोटरीची चतुसुत्री अंगिकारा : अरुणभाई गुजराथी

जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर रोटरीची चतुसुत्री अंगिकारा : अरुणभाई गुजराथी 

"रोटरी क्लब चोपडा यांचा सुवर्णमोहत्सव उत्साहात साजरा".


चोपडा, (प्रतिनिधी) :
चोपडा रोटरी क्लबला ५० वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त सुवर्ण मोहत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी बोलत होते .
  

कार्यक्रमाची सुरवात कु.गौरी पाटील हिने गणेश वंदना या सुंदर नृत्याने तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली , गायक पंकज पाटील यांनी शिवजयंती चे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एकच "राजा इथे जन्मला" हे गीत वेशभूषेत गायन करून उपस्थितांची मने जिंकली. '१९७१ ते २०२१ या ५० वर्षांच्या' कालखंडात चोपडा रोटरीने राबविलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमांचे पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन दाखविण्यात आले. तसेच आत्तापर्यंत ज्यांनी रोटरीचा अध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली त्या सर्व रोटरीचा अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला व दिव्यंगत रोटेरियन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच रोटरी इंटरनॅशनल ने चोपडा रोटरीच्या ५० वर्ष दिलेल्या सेवेसाठी 'विशेष सन्मान पत्र रोटरी चे विद्यमान अध्यक्ष नितीन अहिरराव' यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी सहप्रांतपाल योगेश भोळे यांनी चोपडा रोटरीला शुभेच्छा दिल्या .
      
माजी प्रांतपाल रोटे. राजेंद्र भामरे यांनी चोपडा रोटरी क्लबने ५० वर्षात अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत, क्लबने मॅचींग ग्रँड आणि इंटरनॅशनल ग्रँड साठी प्रयत्न करावे असे सांगत क्लबच्या उपक्रमांचे कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर रोटे. डॉ.आनंद झुणझुणवाला यांनी सुवर्ण महोत्सवी सोहळ्या निमित्त शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा सौ. आशा वाघजाळे यांनी करून दिला

कार्यक्रमाचे अध्यक्ष व विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी आपल्या मनोगतात म्हणाले की चोपडा क्लब हा गौरवशाली परंपरा असणारा आहे. ५० वर्षात रोटरीच्या विरोधात एकही बातमी नाही, हे वैशिष्ट्य आहे. समाजाला गराजानुरुप उपक्रम रोटरीने राबविले आहेत. सेवेला अंत नाही. सेवेपुढे अल्प विराम नाही की पूर्ण विराम नाही. वृक्ष संवर्धनासाठी रोटरीने काम केले पाहिजे. रोटरीने समाजाला संजीवनी दिली. मानवतेचा, मैत्रीचा, सेवेचा विचार आणि संस्कार दिला. इथे समाजातल्या सर्व क्षेत्रातली लोक एकत्रित काम करतात. रोटरीची चतुसुत्री जीवनाच्या सर्व क्षेत्रात मार्गदर्शक आहे. चरित्र, चारित्र्य घडवण्याचे व्यासपीठ रोटरी आहे, माझ्या कुटुंबातील चार सदस्य रोटेरियन आहेत व तीन पिढ्या रोटरीत सक्रीय आहेत. रोटरी एक चळवळ असून गौरवशाली परंपरा आहे, 1972 साली मी रोटरीचा अध्यक्ष असताना त्यावर्षी भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा चोपडा रोटरीने दररोज ५०० लोकांना फक्त पन्नास पैशात भाजी - भाकरी उपलब्ध करून दिली होती. मैत्रीतून रोटरीचा जन्म झाला असल्याचे सांगत जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रोटरीची चतुसूत्री अंगिकारली पाहिजे असे त्यांनी सांगितले .

रोटरीच्या उपक्रमांचे लाभार्थी असलेले मानव सेवा तिर्थ केंद्राचे व्यवस्थापक नरेंद्र पाटील यांनी 'उन्हात असलेल्या मानव सेवा तिर्थाला सावली दिली' असे सांगत रोटरीचे धन्यवाद व्यक्त केले. तसेच माजी प्रेसिडेंट डॉ. परेश टिल्लू यांनी मनोगतात 'रोटरीने मला काय दिले?' याविषयी अनुभव कथन केले.

चोपडा रोटरीचा स्थापना दिवस केक कापून साजरा करण्यात आला. ५० वर्षापासून सदस्य असलेले ज्येष्ठ रोटे. बी.एम.पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून हा आनंद साजरा केला. माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, भावी प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला, सहप्रांतपाल योगेश भोळे, क्लब प्रेसिडेंट नितीन अहिरराव, सेक्रेटरी अॅड. रुपेश पाटील यांची मंचावर उपस्थिती होती.
     
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चोपडा रोटरीचे अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी केले, सूत्रसंचालन राधेश्याम पाटील यांनी केले तर आभार रोटरीचे सचिव रूपेश पाटील यांनी मानले...

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...