Sunday 21 February 2021

दलित वस्ती सुधार योजनेचा गैर वापर करणाऱ्या विरोधात बेमुदत उपोषणा इशारा !!

दलित वस्ती सुधार योजनेचा गैर वापर करणाऱ्या विरोधात बेमुदत उपोषणा इशारा !!


कल्याण, (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे भ्रष्ट अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर व त्यांना पाठीशी घालणारे खडकपाडा पोलीस स्टेशन विरोधात ॲट्रॉसिटी नुसार कारवाई करण्यासाठी आरपीआय प्रणित डी बी एन संघटना, आरपीआय आठवले गट, आर पी आय आंबेडकर गट व मनसे या समविचारी पक्ष संघटनांनी खडकपाडा पोलीस स्टेशन ला भेटी देवून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला 


कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील कल्याण मिलिंद नगर येथील दलित वस्तीत  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार निधीतून शौचालय मंजूर झाले होते मात्र मिलिंद नगर या दलित वस्तीला शौचालय पासून वंचित ठेवून ज्या विभागात शौचालयाची गरज नाही व दलित वस्तीही नाही अशा भवानी नगर मध्ये सदर निधी वळवून भवानी नगर मध्येच शौचालयाचे काम सुरू केले आहे याबाबत 3 फेब्रुवारी रोजी अ प्रभाग अधिकारी, संबंधित कर्मचारी यांनी कर्तव्यात कसूर व अधिकाराचा गैरवापर करणे, दलित वस्तीतील लोकांना सार्वजनिक संपत्ती च्या वापरा पासून वंचित ठेवणे, त्याला त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणे, महाराष्ट्र शासन व केडीएमसी मुख्यालयातील लोकसेवकास खोटी माहिती पुरवणे, तसे खोटे दस्तावेज तयार करणे, दलित वस्तीच्या निधीचा गैरवापर करणे यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका ब प्रभाग अधिकारी, कर्मचारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारित कायदा 2015 ॲट्रॉसिटी नुसार कायदेशीर कारवाई करण्यासाठी आरपीआय प्रणित डी बी एन संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष मिलिंद वानखडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकपाडा यांना तक्रारी अर्ज दिला होता या अर्जावर 20 फेब्रुवारीपर्यंत खडकपाडा पोलीस स्टेशन ने कोणतीही कारवाई केली न केल्यामुळे पोलीस अधिकारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी व कॉन्टॅक्टर यांना पाठीशी घालून कर्तव्यात कसूर व अधिकाराचा गैरवापर करत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे केडीएमसी अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर व खडकपाडा पोलीस ठाणे यांच्या विरोधात आरपीआय प्रणित डीबीएन संघटना, आरपीआय आठवले गट, आरपीआय आंबेडकर गट, मनसे या समविचारी पक्ष संघटनांच्या शिष्टमंडळाने 20 फेब्रुवारी रोजी कल्याण येथील डीसीपी कार्यालय, एसीपी कार्यालय, वरिष्ठ निरीक्षक पोलीस ठाणे खडकपाडा यांना भेटी देऊन बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. यावेळी आरपीआय प्रणित डी बि एन संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष मिलिंद वानखेडे, आरपीआय आठवले गट कल्याण शहराध्यक्ष संतोष जाधव, आरपीआय आंबेडकर गट कल्याण शहराध्यक्ष संजय जाधव, मनसे कल्याण विद्यार्थी सेना शहर सह सचिव गणेश नाईक, सुनील उतेकर, सुनील शिंदे, राजू शिंदे, पंकज डोईफोडे, शाखा अध्यक्ष दिलीप गायकवाड आदींसह असंख्या पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !!

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !! मुंबई (शांताराम गुडेकर) :       ...