Thursday 25 February 2021

शहरात स्वस्त घरांची निर्मिती, वसई-विरारमध्ये एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली !

शहरात स्वस्त घरांची निर्मिती, वसई-विरारमध्ये एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली !

चटई क्षेत्रफळात वाढ.......


वसई : वसई-विरार महापालिका क्षेत्रात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू करण्यात आली असून यामुळे बांधकामासाठी तिप्पट वाढीव चटई क्षेत्रफळ मंजूर करण्यात आले आहे. 

यामुळे शहरात परवडणाऱ्या स्वस्त घरांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा दावा केला जात आहे.
 
वसईच्या हरित पट्ट्याला धक्का न लावता पर्यटन, उद्योग आदी क्षेत्राला चालना मिळणाऱ्या तरतुदी या नव्या नियमावलीत करण्यात आल्या आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास योजनाही शहरात लागू करता येणार आहे. 

मुंबई वगळता संपूर्ण राज्यात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली असावी यासाठी नगरविकास खात्याने तत्कालीन प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने आराखडा तयार करून तो २८ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केला होता. त्यावर हरकती आणि सूचना मागविल्यानंतर तो प्रसिध्द करण्यात आला. ही नवीन एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आली आहे. 

या नव्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे वसई विरार क्षेत्रात सर्वाधिक ४.८ चटईक्षेत्रफळ (एफ.एस.आय.) मिळणार आहे. त्यात १.१० मूळ चटईक्षेत्रफळ, ०.५ इतके अधिमूल्य (प्रीमिअम) भरून अतिरिक्त चटईक्षेत्रफळ, १.४० इतके विकास हक्क हस्तांतरण (टी.डी.आर.) आणि ०.६ अतिरिक्त चटईक्षेत्रफळ असा अंतर्भाव आहे. रस्त्याची किमान रुंदी ३० मीटर आवश्यक आहे. 

यामुळे मोठ्या प्रमाणात बांधकामे होऊन सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तातील घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत. यापूर्वी केवळ एक हे मूळ चटईक्षेत्रफळ आणि १.४ इतका टी.डी.आर. होता.

No comments:

Post a Comment

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !!

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !! मुंबई (शांताराम गुडेकर) :       ...