Thursday 25 February 2021

नव्या वाहनांचा प्रस्ताव चर्चेविनाच मंजूर, विरोधी" पक्षनेत्यांनाही नवी गाडी" ;

नव्या वाहनांचा प्रस्ताव चर्चेविनाच मंजूर, विरोधी" पक्षनेत्यांनाही नवी गाडी" ; 

प्रस्तावाला विरोध करणारे भा.ज.पा. नगरसेवक मात्र गैरहजर........


ठाणे : करोना संकटामुळे उत्पन्नात घट झाल्याने पुढील आर्थिक वर्षासाठी काटकसरीचा संकल्प महापालिका प्रशासनाने सोडला असला तरी, दुसरीकडे मात्र सत्ताधारी शिवसेनेने  झालेल्या स्थायी समितीत कोणत्याही चर्चेविना नव्या वाहन खरेदीचा प्रस्ताव मंजूर करून हौस भागवून घेतली. 

या प्रस्तावाविरोधात भूमिका मांडण्याच्या तयारीत असलेले विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनाही शिवसेनेने नवे वाहन देण्याची सूचना करत शांत केल्याने त्यांनीही चुपी साधली. 

तर, गेल्या दोन दिवसांपासून या प्रस्तावाला कडाडून विरोध करणारे भा.ज.पा.चे नगरसेवक मात्र सभेला गैरहजर होते. त्यामुळे कोणत्याही विरोधाविनाच हा प्रस्ताव मार्गी लागला असून त्यात आता विरोधी पक्ष नेत्यांच्या वाहनाच्या खर्चाची भर पडली आहे. 

करोना संकटाच्या काळात महापालिकेला विविध करापोटी मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये मोठी तूट आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी पुढील वर्षासाठी काटकसरीचा अर्थसंकल्प सादर केला. 

महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतानाही पालिका पदाधिकाऱ्यांनी मात्र नवी वाहनांची मागणी केली होती. त्याआधारे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने एक प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, महिला व बालकल्याण समिती सभापती, वर्तकनगर आणि माजिवाडा प्रभाग समिती अध्यक्ष यांच्यासाठी एकूण ७ नवीन वाहने खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी ७० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. 

या प्रस्तावावरून सत्ताधारी शिवसेनेवर टीका होऊ लागली होती.

No comments:

Post a Comment

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !!

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !! मुंबई (शांताराम गुडेकर) :       ...