Thursday 25 February 2021

पर्यटकांची देशांतर्गत भटकंतीला पसंती....

पर्यटकांची देशांतर्गत भटकंतीला पसंती....
 

पुणे : टाळेबंदीमुळे गेल्या वर्षी पर्यटनाचे दोन्ही हंगाम हातून पूर्णपणे गेले असले तरी आता हळूहळू पुन्हा एकदा पर्यटकांचा प्रतिसाद वाढू लागला आहे.

उन्हाळी सुट्टीत सहलीला जाण्यासाठी पर्यटन कंपन्यांकडे नोंदणी सुरू केली आहे. सद्य:स्थितीत देशांतर्गत भटकंतीवरच सारा भर असल्याचे दिसत आहे. टाळेबंदी शिथिल होऊ लागल्यानंतर शहरानजीकच्या पर्यटनात हळूहळू वाढ होत गेली. दिवाळी आणि नाताळच्या काळात स्वत:च सहलींचे नियोजन करून नागरिकांनी भटकंती सुरू केली. 

पर्यटन कंपन्यांच्या माध्यमातून आखलेल्या सहलींचे प्रमाण आणि प्रतिसाद अत्यल्पच होता. आता मात्र परराज्यातील, दूरच्या पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन पर्यटकांनी सुरू केले आहे. एप्रिल ते मे या दरम्यानच्या सहलींसाठी नागरिकांनी नोंदणी सुरू केली आहे. पुढील सहा महिन्यांत ६७ टक्के पर्यटक भटकंतीसाठी उत्सुक असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आल्याचे पर्यटन कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. 

करोनाचे सावट कायम गेल्या काही दिवसांत करोना रुग्णांचे वाढलेले आकडे, पुन्हा टाळेबंदीबाबत सुरू झालेली चर्चा यामुळे सध्या लगेचच उन्हाळी सुट्टीच्या सहलींवर परिणाम दिसत नाही. मात्र पुढे काय होणार याची धास्ती पर्यटन कंपन्यांना आहे. ‘क्रूझ’ पर्यटनाबाबत उत्सुकता देशांतर्गत वाहतूक, दळणवळण सुरू झाले असले तरी परदेशी दळणवळण मात्र अद्याप पूर्वपदावर आलेले नाही. 

अनेक देशांमध्ये परदेशी नागरिकांवर बंदी आहे. 
भारतातून होणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणेही मोजकीच आहेत. त्यामुळे सध्या देशांतर्गत पर्यटनावरच कंपन्या आणि पर्यटकांचीही अधिक भिस्त आहे. त्यातही वेगळी ठिकाणे, क्रूझ यांबाबत पर्यटकांमध्ये अधिक उत्सुकता आहे. 

परदेशातील ठिकाणांमध्ये दुबई, मालदिव आणि इजिप्तसाठी नोंदणी होत असल्याची माहीती पर्यटन कंपन्याच्या प्रतिनिधिंनी सांगितले.

No comments:

Post a Comment

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !!

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !! कल्याण, प्रतिनिधी : जिजाऊ संघट...