Thursday 25 February 2021

लवकरच ‘वॉटर टॅक्सी’ची सफर !! "मुंबईतून वाशी, ऐरोली, नेरुळ, बेलापूर, जे.एन.पी.टी., रेवसकडे झटपट प्रवास".......

लवकरच ‘वॉटर टॅक्सी’ची सफर !!

"मुंबईतून वाशी, ऐरोली, नेरुळ, बेलापूर, जे.एन.पी.टी., रेवसकडे झटपट प्रवास".......


मुंबई : मुंबईतून जलमार्गाने वाशी, ऐरोली, नेरुळ, बेलापूर, जे.एन.पी.टी., रेवस आदी परिसरात झटपट पोहोचण्याचे मुंबईकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून ‘भारतीय सागरी परिषदे’च्या (इंडियन मेरिटाइम समिट) निमित्ताने मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि विविध कंपन्यांमध्ये याबाबत नुकतेच सामंजस्य करार करण्यात आले. परिणामी, येत्या काही महिन्यांतच नागरिकांना ‘वॉटर टॅक्सी’ची सफर घडणार आहे. 

बंदर आणि सागरी क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी ‘बंदर, नौवहन आणि जलमार्ग’ मंत्रालयाने २ ते ४ मार्च दरम्यान ‘भारतीय सागरी परिषदे’चे (मेरिटाइम इंडिया समिट) आयोजन केले आहे. ही परिषद आभासी पद्धतीने होणार असून, त्या निमित्ताने विविध सामंजस्य करार करण्यात येत आहेत. 

मुंबई पोर्ट ट्रस्टने दोन दिवसांत एकूण सात हजार ५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून एकूण २० हजार कोटींचे सामंजस्य करार करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी दिली. 

या सामंजस्य करारांमुळे मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी वॉटर टॅक्सी सुविधा सुरू करण्यास चालना मिळाली आहे.मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे या सेवेचे नियोजन केले जाणार असून ही सेवा खासगी चालकांमार्फत चालवली जाईल.यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कॅटामरान, लाँच यांचा वापर करण्यात येईल, असे पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नेरुळ आणि बेलापूर येथे जेट्टीचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल.

परिणामी पुढील दोन महिन्यांमध्ये तिथे ही सुविधा सुरू होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या सेवेचे प्रवासभाडे किती असावे यासंदर्भात चर्चा सुरू आहे.

No comments:

Post a Comment

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !!

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !! मुंबई (शांताराम गुडेकर) :       ...