Sunday 28 February 2021

कल्याण मुरबाड महामार्ग बेवारस, मलिदा कोणाला तर त्रास जनतेला?

कल्याण मुरबाड महामार्ग बेवारस, मलिदा कोणाला तर त्रास जनतेला?


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण मुरबाड नगर या महामार्गावरून ये जा करणारी अवजड वाहने, रस्त्यावर अनाधिकृत पणे उभी राहणा-या गाड्या यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि केवळ 'कलेक्टर' ची भूमिका बजावणारे वाहतूक पोलीस यामुळे सध्या कल्याण मुरबाड महामार्ग हा बेवारस झाला आहे. त्यामुळेच मलिदा खातो कोण व त्रास कोणाला असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कलेक्शन अर्थात कलेक्टर हे कोणाला म्हटले जाते हे माहीत नाही असा वाहनचालक, ड्रायव्हर, वाहतूक पोलीस किंवा पोलीस अथवा एंजट शोधून सापडणार नाही. त्यामुळे काही पोलीस मुद्दाम गर्दीची ठिकाणे ड्युटी मागून घेतात, आता यांच्या मदतीला रितसर वार्डन दिले आहेत. त्यामुळे आता हे बिनधास्त, काही करा बळीचा बकरा वार्डन, अर्थात सर्वच वाईट अथवा भ्रष्टाचारी नाहीत हेही तितकेच खरे आहे. उन वारा पाऊस धुळ, धूर अशा जिवघेण्या अडचणीत ही इमानेइतबारे ड्युटी करणारे आहेत. पण करतो एखाद्या आणि नशिबाला येते सर्वाच्या, असो कल्याण मुरबाड या दोन तालुक्यांना जोडणारा नगर हा महामार्ग वाहतुकींच्या दृष्टीने खूपच महत्वाचा मानला जातो. परंतु सध्या हा महामार्ग बेवारस आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण या मार्गावरील वाहतूक कोंडी ही धोबीघाट पर्यंत उल्हासनगर शहर वाहतूक शाखा नियंत्रित करते. येथून पुढे म्हणजे म्हारळ ग्रामपंचायत हद्दीपासून ते रायते नदी व पुढील गोवेली पोलीस चौकीचे पोलीस यावर देखरेखीखाली वाहतूक चालते.
म्हारळ पोलीस चौकीत एक वाहतूक पोलीस आहेत त्यांच्याकडे इतका "अधी +भार" आहे की विचारता सोय नाही, ते कसे वाहतूक नियंत्रण करतात हे सर्व श्रुत आहे. तसा त्यांच्या कामाचा डंका वाजतोय, म्हारळ वाईन शाॅप समोरील वाहनांची गर्दी म्हारळ पाडा, वरप, टाटा पॉवर, पेट्रोल पंप येथील वाहतूक कोंडी, बजरंग हार्डवेअर चे रस्त्यावरील अतिक्रमण, मॅरेज हाॅल समोर रस्त्यावर अनाधिकृत उभ्या केलेल्या गाड्या, जागोजागी निर्माण झालेले रिक्षा स्टँड, यामुळे इको व रिक्षा यांच्यात उडणारे खटके यातून  मिळणाऱ्या 'कोंबडा पाट्या' काळी पिवळी चे सेक्शन, अवजड वाहनांचा अधिभार या सर्वांमुळे या मार्गावर कोणीही विनामास्क, विनाहेलमेट, विधाऊट लाईन्स, ओव्हर्ससीट चालण्यास जणू काही परवानगीच देण्यात आली आहे.. कालच भले मोठे एक अतिअवजड वाहन ऐन गर्दीच्या वेळी म्हणजे सकाळी ११/१२ च्या दरम्यान म्हारळ, वरप, कांबा, रायते अशा गर्दीच्या गावातून जाताना दिसले, विशेषतः येथे कोणताही वाहतूक पोलीस किंवा पोलीस नव्हते. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. दुर्दैवाने काही अपघात घडला असता तर याला कोण जबाबदार? अशी वाहने शक्यतो रात्री च्या वेळी रस्ता खाली असताना सोडायला हवीत, परंतु येथे असे दिसले नाही. त्यामुळे याचा त्रास मात्र जनतेला व या रस्त्यावरून ये जा करणा-या नागरिकांना होतो आहे. याबाबत आ किसन कथोरे यांना विचारले असता ते म्हणाले 'हा विषय येत्या अधिवेशनात उपस्थित केला जाईल तसेच रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे पाठपुरावा करण्यात येईल'.

No comments:

Post a Comment

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !!

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !! मुंबई (शांताराम गुडेकर) :       ...